डॉ. अमोल अजमेरे व डॉ. रविंद्र गायकवाड यांच्या तीर्थंकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे उद्घाटन प्रसंगी आमदार आशुतोष काळें यांनी भावि वाटचालीस पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या….

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव मधील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.अमोल अजमेरे व जनरल फिजिशियन डॉ.रवींद्र गायकवाड यांच्या तीर्थंकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटपलचे उदघाटन कोपरगाव तालुक्याचे युवा आमदार आशुतोष काळे व मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.अमोल अजमेरे व जनरल फिजिशियन डॉ.रवींद्र गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराज चौका जवळ एकवीस खाटांचे सुसज्य रुग्णालय उभारले असुन त्यात अतिदक्षता विभाग,मेडिकल नर्सिंग होम,सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम,मल्टिपॅरामॉनिटर्स,डिफिब्रिलेटर,वातानुकुलीत खोल्या,इंफुजन पंप,अत्याधुनिक प्राणवायू कक्ष,एक्सरे सुविधा,कॉम्पुटराईजड ई.सी.जी.,मेडिकल स्टोअर्स,पॅथॉलॉजी लॅब,सेमी डिलक्स रूम आदी सेवासुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

यावेळी कोपरगाव सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे,गोदावरी सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,

राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,कार्याध्यक्ष राजेंद्र जाधव,कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,

उद्योजक कैलास ठोळे,अरविंद भन्साळी,श्रीरामपूर येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ कुमार चोथानी,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,डॉ.राजेश माळी,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी गटनेते डॉ.अजय गर्जे,डॉ.प्रीतम जपे,डॉ.विजय कोठारी,डाॅ.संदीपजी मुरुमकर, डाॅ.मयुर जोर्वेकर,डाॅ.गोधळी महेद्र,शिवसेना शहराध्यक्ष कलविंदरसिंग दडियाल,तसेच शिवसेनेचे विक्रांत झावरे,

डॉ.रामदास आव्हाड, दिलीप अजमेरे,राहुल अजमेरे,आनंद अजमेरे,ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र बोरावके, रमेश कोठारी, योगेश कोठारी, शंतनु सरवार, डॉ. सतिष अजमेरे, सतिष काळे, दिपक विसपुते, मंदार पहाडे, शिलेदार, राजु वाघचौरे, विरेन बोरावके, डॉ. मुळे, वाबळे, सुधीर डागा, सत्येन मुंदडा आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *