
कोपरगाव प्रतिनिधी:-
येवला रोडलागतच्या सर्वे नं.210 वरील रिझर्वेशनबाबत 100% खोटे व गैरसमज पसरविण्याचे काम कोल्हे गट पत्रके वाटून करत आहे.
दि.23/12/1येवला985 मध्ये नियोजन समितीच्या मीटिंगमध्ये सदरच्या जागेवरील आरक्षण वगळण्याचा ठराव झालेला आहे(ठराव क्र. 4) त्यावेळी नगराध्यक्ष होते स्व.वसंतराव सातभाई.आज त्यांचेच कर्तृत्ववान चिरंजीव संजय सातभाई पत्रकार परिषदेत जास्तच तारे तोडताहेत.ते किती कर्तृत्ववान आहेत हे बँकेच्या ठेवीदारांना चांगलेच माहित आहे.त्याविषयी मी आज काहीच बोलणार नाही
त्यानंतर स्व.माधवरावजी आढाव नगराध्यक्ष असतांना दि. 18/6/1989 मध्ये विशेष सर्वसाधारण सभेत ही आरक्षणे वगळण्याचा (ठराव क्र.9) झाला होता.
त्यानंतर दि.3/10/2001 ला सर्वसाधारण सभेत स.नं. 205 व 210 वरील आरक्षणे कमी करावीत असा (ठराव क्र.11अ) झाला होता.नगराध्यक्षा होत्या सौ.कांचनबाई धनालाल काले.
दि.30/10/2002 मध्ये अनुक्रम नं.17 नुसार आरक्षित जमीन खरेदीसाठी खूप मोठी रक्कम लागते व नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने सदरची आरक्षणे संपादित करता येणार नाही असाही ठराव झाला.
औरंगाबाद खंडपीठ येथे (रिटपीटीशन नं.9832/2017 व 9833/2017) आरक्षण उठविण्यासाठी दावा दाखल केला होता.खंडपिठाच्या निकालानुसार हे आरक्षण रद्द करण्यात आले आहे.
खोटेनाटे आरोप कराल तर अडचणीत याल याचे भान ठेवा.
ज्यांच्या काळात आरक्षण वगळण्याचे ठराव झाले त्यांचे वारसदार मात्र भंपकसारखे आरोप करताहेत हे दुर्दैवी आहे. पोलीस परेड ग्राऊंड व पोलीस स्टेशनच्या जागेबद्दलही आमच्यावर नाहक टिका सुरू आहे.
यांना क्रीडांगण व खेळाडूंची खरेच काळजी असती तर कोपरगावचे क्रीडासंकुल संजीवनीवर पळविले गेले तेंव्हा का मान घालून गप्प बसले?का विरोध केला नाही?
कोल्हे व त्यांच्या सहकाऱ्यांना खरोखरच क्रीडांगणाची काळजी असेल तर त्यांनी “इंडोअर गेम हॉल” मैदानावरील अतिक्रमणे उठविण्याची लेखी मागणी करावी. मी मात्र ही अतिक्रमणे काढण्यासाठी नगरपरिषदेमार्फत नोटिसा बजावल्या आहेत. तुमच्यात आहे का हिंमत? मतांच्या लाचारीमुळे तुमच्यात ती धमक नाही, तुमचा भेकडपणा सर्वजण जाणतात.
तुमच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असेलेल्या महापुरुषांचे पराक्रमही अजून बाहेर येतीलच. जरा वाट पहा.
