
कोपरगाव प्रतिनिधी:-
महाराष्ट्रात अग्रगण्य असणारे प्रसिद्ध असे नावाजलेले सकाळ वृत्तपत्र यांनी माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांना मिळालेल्या आज परियन्तच्या नगराध्यक्षा मध्ये सर्वात कमी नगराध्यक्ष पदाच्या २००९ साली , अगदी कमी काळ ( साडेचार महिने फक्त ) या मिळालेल्या कार्यकाळात केलेल्या शहर विकासाच्यासाठी केलेले कामाचे / प्रयत्नाचे ,जेणेकरून गावाची बाजारपेठ वाढेल ,अश्या चांगल्या कामाबद्दल व ५ नंबर च्या पिण्याच्या पाण्याच्या साठवण तळ्यांच्या साठी उभारलेले जनआंदोलन व इतर करीत असलेल्या सामाजिक कामाची दखल घेवून आयडॉल महाराष्ट्र या पुरस्काराने सन्मानित केले त्या बद्धल सकाळ समूहाचे पाटील यांनी मानले आभार..


सकाळ वृत्तपत्र समूहाच्या वतीने “आयडॉल ऑफ महाराष्ट्र” या पुरस्काराने माजी नगराध्यक्ष मंगेश माधवराव पाटील यांना सन्मानित करताना राज्याचे आदर्शगाव संकल्प व कृती समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री मा.पोपटराव पवार,समवेत विशेष पोलीस महानिरीक्षक ( नाशिक परिक्षेत्र) मा.डॉ .बी.जी.शेखर,प्रसिद्ध अभिनेते मा.मिलिंद शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक मा.मनोज पाटील,अहमदनगर महापालिका आयुक्त डॉ.पंकज जावळे,सकाळचे नगर आवृत्तीचे संपादक प्रकाश पाटील व आदींच्या उपस्थितीत देण्यात आले. मंगेश पाटील म्हणाले की,,
कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नाच्या आंदोलनात ज्या ज्या लोकांनी , संघटनांनी , विविध वृत्तपत्र , न्यूज चॅनेल , पत्रकार बांधव , पक्ष विरहित जाती निहाय पुढे यून , माता भगिनींनी सक्रिय सहभाग घेतला, त्या सर्वे नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानून पाटील यांनी अभिनंदन केले आणि म्हणाले की खरे पाण्याचे श्रेय हे सर्वांचे एकत्रीत जनतेचे / नागरिकांचे , लढ्याचे ,पाणी संघर्ष समिती चे आहे , मी खूप आधीपासून ठाम पने ही गोस्ट सर्वांच्या निदर्शनास आणून देत होतो की येसगाव येथील २५ एकर जागेतील ५ नंबर साठवण तळ्यांचे काम झाल्यशिवाय कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटणार नाही.

मा. आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांनी मात्र ही गोस्ट गांभीर्याने लक्षात घेवून , त्याचा पाठपुरावा केला आणि येव्हडा प्रचंड निधी (१३१कोटी) आणला , त्या बद्धल त्यांचे खूप आभार.
