
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती श्री. मच्छिंद्र टेके पाटील याच्या मातोश्री गं. भा. वत्सलाबाई सावळेराम टेके यांचे सोमवारी (दि. १८) रात्री ९:३८ वाजता वयाच्या ९१ व्या वर्षी वृद्धाकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी मंगळवारी (दि. १९) सकाळी १०:३० वाजता वारी येथील गोदावरीतीरी होणार आहे.
शोकाकूल
श्री. मच्छिंद्र सावळेराम टेके पाटील
श्री. अण्णासाहेब सावळेराम टेके पाटील
श्री. नानासाहेब सावळेराम टेके पाटील
श्रीमती सुलोचना भोजराज धट पाटील
सौ. मंदाताई सीताराम डांगे पाटील
समस्त टेके पाटील परिवार, वारी.
सूचना :- गोदावरी नदी प्रवाहीत असल्याने वारी येथील गोदावरीच्या पुलावर पाणी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे संवत्सर – भोजडे चौकी मार्गे वारीत यावे.
