संजीवनी एमबीएच्या २३ विध्यार्थ्यांची गती लॉजिस्टिक्स, अवास फायनान्स व एचसीएल मध्ये निवड -श्री अमित कोल्हे…

Uncategorized

                                                   एमबीएच्या ऑटोनॉमस दर्जाचे उत्तम फलित...

कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी एमबीएच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने राबविलेल्या विशेष अभियानातुन शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधिल एमबीएच्या अंतिम वर्षातील २३ विध्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत गती लॉजिस्टिक्स, अवास फायनान्स व स्टेट स्ट्रीट एचसीएल सर्विसेस या कंपन्यांनी मुलाखती घेवुन सरासरी वार्षिक पॅकेज रू ३. ५० लाखावर नोकऱ्यांसाठी निवड केली आहे. ही निवड विध्यार्थ्यांच्या अंतिम निकालाच्या अगोदरच झाली आहे. संजीवनी एमबीएला ऑटोनॉमस दर्जाचे हे फलित असुन १०० टक्के विध्यार्थ्यांना नोकऱ्या मिळवुन देण्याच्या उद्दिश्टाकडे वाटचाल सुरू असल्याचे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्याुटस्चे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकातुन सांगीतले आहे.
गती लॉजिस्टिक्स या कंपनीने स्नेहल प्रकाश काळे व त्रिवेणी विलास काळे यांची निवड केली आहे. अवास फायनान्स कंपनीने वैष्णवी राजेश त्रिभुवनची निवड केली आहे. स्टेट स्ट्रीट एचसीएल सर्विसेस कंपनीने पुन्हा स्नेहल, वैष्णवी व त्रिवेणी सह दिपाली पद्माकर जोशी , गौरव संदिप वाघ, प्रसाद काशिनाथ काळे,शिवम सतीश कर्डिले, सावन पोपट भालेराव, सौरभ शंकर चव्हाण, पुणम सांगळे, वरूण संजय जगझाप, नानासाहेब दामोधर कोपनर, मीत मेहुल पटेल, ऐश्वर्या दत्तात्रय जगताप, अंजली गोपाल मंटाला,माधुरी बाळासाहेब रावुत, तुषार अरूण वामन, नितिन बाबासाहेब देवकर, किरण संजय शिंदे व सागर अनिल कदम यांची निवड केली आहे. संजीवनी एमबीएला ऑटोनॉमस दर्जा प्राप्त असल्यामुळे कंपन्यांना अभिप्रेत असलेल्या अभ्यासक्रमाचा अंतर्भाव केलेला असल्यामुळे लवकरच विध्यार्थ्यांना १०० टक्के नोकऱ्या मिळवुन देण्याचे उद्दिश्ट पुर्ण होईल, असे श्री कोल्हे यांनी शेवटी म्हटले आहे.
एमबीए, इंजिनिअरींग, पॉलीटेक्निक, फार्मसी, बीबीए, सिनिअर कॉलेज मधिल विध्यार्थ्यांना संजीवनी मार्फत नोकऱ्या मिळवुन देण्यात यश मिळत असल्याने सर्व सामान्य कुटूंबातील विध्यार्थ्यांचे नोकरदार होण्याचे स्वप्न पुर्ण होत आहे. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांनी समाधान व्यक्त केले असुन त्यांनी तसेच मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी निवड झालेले एमबीएचे विध्यार्थी, त्यांचे पालक तसेच डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, एमबीए विभाग प्रमुख डॉ. विनोद मालकर आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *