मानवता हाच खरा धर्म हिच खरी साई सेवा:- साईसेवक गणेश दळवी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
मानवता हाच खरा धर्म हिच खरी साई सेवा
एकीकडे आपण सर्व जन आषाडी एकदशी निमित्त विठ्ठल माऊलीच्या भक्तीमय वातावरणात कोणी वारी करत पायी चालत पंढरपूरला जाउन दर्शन घेत होते तर कोणी आपण जेथे आहे तेथेच पांडुरंगाची पूजा करून नतमस्तक होत होते एकंदरीत सर्वजन भक्ती करत होते अशावेळी कोपरगाव येथिल शिवयोगि जनार्दन स्वामि मंदिरा जवळ रोडवर एक मनोरुग्ण माऊली भर पावसात रस्त्यावर भटकत होती

अशावेळी कोपरगाव चे समाजसेवक राजूभाऊ जाधव यांना या माऊली ची अवस्था पहावली नाही तेव्हा ते तिला घेऊन आपल्या साईआश्रयात आले तिची अवस्था पाहून खरंच खूप वाईट वाटले कित्येक वर्षा पासून ती अशीच भटकत असावी तिचे केस व गलिच्छ अवतार पाहून असे दुःखी जीवन कुणालाही नको असे वाटले साईआश्रयातील महिला सेवकांनी तिचे केस कापून स्वच्छता केली हिच खरी विठ्ठल माऊलीची सेवा असे म्हणावे लागेल
ओम साई राम
साई सेवक – गणेश दळवी
मो – 9637549300

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *