ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्य ग्रामीण भागात उल्लेखनीय:-आ.डॉ सुधीर तांबे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील परशराम साबळे यांनी समाजातील गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना अल्पावधीत उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे या उद्देशाने ग्रामीण भागात स्थापन केलेल्या ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्य उल्लेखनीय असल्याचे गौरोउद्गार नाशिक पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी नुकतीच कोपरगाव शहरातील संस्थेच्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली असता या प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
या भेटी प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांनी आमदार तांबे यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या. या वेळी संस्थेचे कमलाताई सातभाई ज्युनिअर कॉलेजचे विशाल धारणगावकर, बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्थेचे विजय कापसे, साई शक्ती इंग्लिश मीडियम स्कूलचे विजय जाधव यांच्यासह रजिस्टर बापूसाहेब डांगे, विलास चव्हाण, राजेंद्र आहेर, निलेश देवकर, रेखा दिवे आदी संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
तसेच याप्रसंगी गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, काँग्रेस पक्षाचे माजी तालुका कार्याध्यक्ष यादवराव त्रिभुवन, काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार पोटे, जिल्हा कार्यकारणी सदस्य सुनील साळुंखे, लेखापरीक्षक राजेंद्र सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते
या भेटी प्रसंगी आमदार तांबे यांनी बोलताना सांगितले की, ग्रामीण भागातील १० वी व १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर कमीत कमी कालावधीत पुढील शिक्षण पूर्ण करत स्वतःच्या पायावर उभे राहता यावे या उद्देशाने साबळे यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून शासनमान्य व्यवसाय शिक्षण देणारे वेगवेगळे अभ्यासक्रम सुरू केले असून त्याचा नक्कीच ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. विशेष म्हणजे संस्थेत सुरू असलेल्या हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण करून अनेक विद्यार्थी भारतातील मोठमोठ्या शहरातील हॉटेलमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेतच पण त्यासोबतच सिंगापूर, मलेशिया, दुबई, जपान ऑस्ट्रेलिया आदी देशात देखील नोकरी करत आहे ही संस्थेची प्रशंसनीय बाब असल्याचे गौरोउद्गार आमदार तांबे यांनी व्यक्त करत संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *