
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी ग्राम विकास मंत्रालयाने ३ कोटी निधी मंजूर केला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
या ३ कोटी निधीतून जवळपास २८ गावातील रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे.यामध्ये शहाजापूर येथील साहेबराव कोळपे घर ते गणपती मंदिर देशमुख वस्ती,मढी बु. रा.मा. ७ ते युसुफ पठाण (पठाण वाडी रस्ता),चांदगव्हाण इ.जी.मा. १६० (धुळबाबा) ते विलास शिंदे घर,मुर्शतपूर इ.जी.मा.१६० मुर्शतपूर मंडपी नाला ते प्र.जी.मा. ८ ला मिळणारा रस्ता, डाउच बु. जि. प. शाळा ते काशिनाथ दहे( डाऊच खुर्द) गावाकडे जाणारा रस्ता,बाहदराबाद दत्तवाडी परिसर ते म्हसोबा मंदिर रस्ता,देर्डे कोऱ्हाळे मढी फाटा ते भगवान होन घर रस्ता, मढी खु. आण्णा आभाळे घर ते उंबरी नाला रस्ता, देर्डे चादवड शांताराम मेहेत्रे वस्ती ते नंदू कोल्हे वस्ती रस्ता,पोहेगाव नंदकिशोर औताडे घर ते शुभम औताडे घर रस्ता,धामोरी विश्वास जाधव वस्ती ते माधवराव जगझाप वस्ती रस्ता, धामोरी ग्रा.मा. १ भास्कर मांजरे शेती ते दत्तू वाघ वस्ती रस्ता,धामोरी ग्रा.मा. १ नारायण मांजरे शेती ते दिलीप जगझाप शेती (तालुका हद्द) रस्ता,सुरेगाव निकम वस्ती ते जुने गावठाण रस्ता, मंजूर रा.मा. ७ मंजूर कमान ते वालझाडे वस्ती रस्ता,पढेगाव भास्कर म्हस्के घर ते दत्तू शिंदे घर रस्ता, तिळवणी पगारे वस्ती पुंडलिक चक्के घर (जिल्हा हद्द) रस्ता, कासली गायकवाड वस्ती ते जमधडे वस्ती (कासली शिरसगाव शिव रस्ता), पढेगाव म्हसोबा मंदिर ते जुना कालवा(पढेगाव – संवत्सर शिव रस्ता),सडे बसस्थानक ते सतिश बाराहाते घर रस्ता,धनगरवाडी बाबुराव गुंजाळ यांचे बरवा पासून ते सुनील रक्टे घर रस्ता, चितळी येथील राहाता – चितळी रोड ते प्रसाद साळवे घर,वाकडी महादेव मंदिर ते सोपान जाधव घर,पुणतांबा सप्तशृंगी मंदिर ते साहेबराव शिंदे घर, संवत्सर कर्पे वस्ती ते लोहकने वस्ती रस्ता,देर्डे कोऱ्हाळे भगवान होन घर ते पवार वस्ती रस्ता या रस्त्यांना प्रत्येकी १० लाख निधीतून खडीकरण करण्यात येणार आहे व घोयगाव नागपूर हायवे ते घोयेगाव गावापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे तसेच धोत्रे नारायण मिसाळ घर ते सयाजी माळवदे घर (लाख रस्ता) या रस्त्यांना २० लाख निधीतून या रस्त्यांचे डांबरीकारण करण्यात येणार आहे.
मागील अनेक वर्षापासून या रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.या रस्त्यांसाठी निधी देवून या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी अशी या गावातील नागरिकांची मागणी होती.त्याची दखल घेवून ना.आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध झाला आहे.त्यामुळे या गावातील नागरिकांनी ना.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.मतदार संघासाठी ३ कोटी निधी दिल्याबदद्ल राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार,ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांचे आभार मानले आहे.
