
कोपरगांव प्रतिनिधी:-
माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या सामाजिक कार्याचा ठेवा खूप मोठा असून त्यातून त्यांनी अहमदनगर जिल्ह्याची ओळख राज्यात निर्माण केली, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे देवस्थान साईबाबा शिर्डीचे तत्कालीन उपाध्यक्ष म्हणून त्यांनी दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी केली अशा शब्दात राहाता नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता पिपाडा व डॉ. राजेन्द् पिपाडा यांनी श्रद्धांजली वाहिली. कोल्हे कुटुंबियांची त्यांनी येसगांव निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतली त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
