
कोपरगाव प्रतिनिधी:-
बेलवंडी येथे पोलीस हवालदारला लाच घेतांना अटक…
प्रस्तुत बातमीतील हकीगत अशी की, यातील तक्रारदार, त्यांची पत्नी, मुलगी व मुलगा यांच्याविरुध्द बेलवंडी पोलीस स्टेशन गुरनं .२०९/२०२३ भा.दं.वि.क. ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे दि१/६/२०२३ रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्हयात दि.१२/६/२०२३ रोजी जामीन प्रक्रियेत मदत केली म्हणून व गुन्हयाच्या तपासात मदत करण्यासाठी ४००००/- रुपये लाचेची मागणी करत असल्याबाबत तक्रारदार यांनी ला.प्र.वि. कार्यालय अहमदनगरकडे तक्रार नोंदविली होती. त्यानुसार आज दि.२२/६/२०.२३ रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता यातील आरोपी लोकसेवक ज्ञानेश्वर रावसाहेब पठारे, पोलीस हवालदार, बक्कल नं.२० वर्ग – ३, नेमणुक बेलवंडी पोलीस स्टेशन, जि. अहमदनगर यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रथम १००००/- रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती ४०००/- रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार आज दि.२१/६/२०२३ रोजी बेलवडी पोलीस स्टेशन येथे सापळा कारवाई आयोजित केली असता पंचासमक्ष सदर लाच रक्कम ४०००/- रुपये स्वीकारली म्हणून बेलवडी पोलीस स्टेशन, जि. अहमदनगर येथे त्यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदर सापळा कारवाई ही मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, मा. श्री माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक व मा. श्री नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री. प्रविण लोखंडे, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर यांचे पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक श्री गहिणीनाथ गमे, मपीना राधा खेमनर व पोकॉ. बाबासाहेब कराड यांचे पथकाने केली आहे.
कोणीही लोकसेवक सर्व सामान्य जनतेला त्यांचे काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, अहमदनगर येथे खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उप अधीक्षक प्रविण लोखंडे यांनी केले आहे.
