

कोपरगाव प्रतिनिधी
(शिर्डी):- आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जून कोपरगांव न्यायालयात तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत योगाभ्यास करत साजरा करण्यात आला.
कोपरगांव न्यायालयाचे पटांगणात जिल्हा न्यायाधीश सयाजीराव को-हाळे, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) शौकत देसाई, सहदिवाणी न्यायाधीश स्वरुप बोस, सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) महेश शिलार, सहदिवाणी न्यायाधीश भगवान पंडित, दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) स्मिता बनसोड यांचे सह न्यायालयीन कर्मचारी, वकील यांनी स्वतः योगासने प्राणायाम, ध्यान करत योगादिवस साजरा केला.

तालुका विधी सेवा प्राधिकरण समिती, कोपरगाव व कोपरगाव वकील संघ कोपरगाव यांचे संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन कोपरगाव न्यायालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. प्रसिद्ध योगशिक्षक संतोष नलगे यांनी योगासन, प्राणायाम, ध्यान या संदर्भात शास्त्रोक्त माहिती सांगितली तर राष्ट्रीय योग शिक्षक महेश थोरात, भावना नलगे यांनी योगासनांची प्रात्यक्षिक सादर केले.

पद्मासन,भुजंगासन, शलभासन, त्रिकोणासन, पर्वतासन,वृक्षासन,
पच्छिमोत्तानासन यासह अनेक श्वसनाच्या अभ्यास, प्राणायाम पूर्व तयारी यासह योगा संदर्भात शास्त्रोक्त माहिती देवून त्याचे निरोगी आणि उत्तम आरोग्यासाठी फायदे सांगितले.

आंतरराष्ट्रीय योग दिनी जिल्हा सरकारी वकील ॲड.अशोक वहाडणे, ॲड.अशोक टुपके, वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. जयंत जोशी, सचिव ॲड. अनुप ठोळे,कार्यालयीन अधीक्षक सुनील निसाळ, परमजित मंटाला, तालुका विधी सेवा समितीचे सागर नगरकर यांचे सह न्यायालयीन अधिकारी आणि कर्मचारी, वकील उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय योग दिनी योग शिक्षकांकडून मिळालेल्या शास्त्रोक्त माहिती आणि प्रात्यक्षिकाने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
