शासनाच्या आदेशान्वये १२ ते १४ या वयोगटातील मुलांना कन्या विद्या मंदिर शिर्डी येथे कोरोना लसीकरणाचा शुभारंभ पार पडला…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
(शिर्डी):-
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीव्‍दारे संचालित रुग्‍णालयाच्‍या वतीने शासनाच्‍या आदेशान्‍वये १२ ते १४ या वयोगटातील मुलांना कन्‍या विद्या मंदिर येथे कोरोना लसीकरणाचा शुभारंभ संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांच्‍या हस्‍ते श्री साईबाबांच्‍या प्रतिमेचे पुजन करुन करण्‍यात आला.
आज पार पडलेल्‍या या कोरोना लसीकरण शुभारंभ कार्यक्रमास ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षिका श्रीमती डॉ.घोगरे, श्री साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे, श्री साईनाथ रुग्‍णालयाच्‍या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.सुनिता कडू, मुख्याध्यापक असिफ तांबोळी तसेच कन्‍या विद्या मंदिरातील शिक्षक वृंद, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.


श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने रुग्‍णालयाच्‍या अखत्‍यारीत कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर शासनाचे निर्देशाप्रमाणे CCC, DCHC व DCH हॉस्पिटल चालविण्‍यात आले होते. त्‍याव्‍दारे १८ मार्च २०२० पासून कोरोनाचे लक्षण असलेले रुग्‍ण व लक्षण रहित सुमारे १० हजार इतक्‍या रुग्‍णांवर मोफत उपचार करण्‍यात आलेले आहेत. कोरोनाच्‍या रुग्‍णांकरीता आक्सिजनची कमतरता लक्षात घेवुन देणगीदार साईभक्‍तांच्‍या देणगीतुन हवेतुन ऑक्सिजन निर्मिती करणारा १२०० (LPM Liter Per Minute) लिटर क्षमता असलेला ऑक्सिजन निर्म‍िती प्रकल्‍प आणि संस्‍थानच्‍या वतीने दररोज सुमारे १३०० चाचण्‍या घेण्‍याची क्षमता असलेली आरटी-पीसीआर लॅब उभारण्‍यात आलेली असून याव्‍दारे सुमारे ०१ लाख २५ हजार इतक्‍या चाचण्‍या मोफत घेण्‍यात आलेल्‍या आहेत. तसेच रुणालयामार्फत शिर्डी व परिसरातील ३५ हजार जणांना प्रथम आणि व्दितीय लसीकरण करण्‍याचे महत्‍वपुर्ण काम करण्‍यात आले व ते आजतागायत सुरु आहे.
याबरोबरच कोरोना व्‍हायरसच्‍या संभाव्‍य लाटेच्‍या पार्श्‍वभुमीवर शासनाच्‍या आदेशान्‍वये दिनांक ०३ जानेवारी २०२२ रोजी १५ ते १८ या वयोगटातील मुलांना लसीकरण सुरु करण्‍यात आले आहे. तसेच आज शासनाच्‍या आदेशान्‍वये १२ ते १४ या वयोगटातील मुलांना लसीकरण सुरु करण्‍यात आले असून कन्‍या विद्या मंदिर येथे सकाळी १०.०० ते सायं.०५.०० यावेळेत उपलब्‍ध असणार आहे. तरी जास्‍तीत-जास्‍त नागरिकांना या सुविधेचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन ही यावेळी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *