
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव कौतुकास्पद ७५ दिव्यांग बांधवांचा रेल्वे प्रवास मनसे दिव्यांग सेनेमुळे होणार सुखकर मनसे नेते श्री अमित राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक २४/०५/२०२२ रोजी मनसे दिव्यांग सेना अहमदनगर जिल्हा यांच्या वतीने दिव्यांग बांधवांना रेल्वे पास काढण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या शिबिरात ज्या दिव्यांग बांधवांनी नाव नोंदणी केली होती अशा ७५ दिव्यांग बांधवांचे रेल्वे पास उपलब्ध झाले असून दिनांक ०९/०३/२०२३ रोजी मनसेच्या १७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दिव्यांगांना रेल्वे पास वाटप करण्यात आले सदर रेल्वे पास वाटपाचा कार्यक्रम मनसे उप जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ गंगवाल तालुकाध्यक्ष अनिल भाऊ गायकवाड तालुका मार्गदर्शक सुनील भाऊ फंड यांच्या मार्गदर्शनाने मनसे दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पारखे तालुका संघटक संजय गीते यांच्या प्रयत्नातून तसेच कोपरगाव रेल्वे स्टेशनचे मुख्य बुकिंग अधिकारी श्री शंतनू मेहरे साहेब व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.श्री सचिन यादव साहेब यांच्या अनमोल सहकार्याने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी कोपरगाव ग्रामीणचे अष्टपैलू पी आय श्री वासुदेवजी देसले साहेब यांच्या शुभहस्ते व लायन्स मूकबधिर विद्यालयाचे सामाजिक कार्यकर्ते श्री नारायण डुकरे सर यांच्या उपस्थितीत दिव्यांग बांधवांना रेल्वे पासचे वाटप करण्यात आले याप्रसंगी बोलताना मनसेच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांना शुभेच्छा देऊन दिव्यांग बांधवांना रेल्वे पास विषयी माहिती दिली तसेच आज जो रेल्वे पास वाटपाचा कार्यक्रम होत आहे याचे पूर्ण श्रेय आमचे दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल यांना जाते त्यांचे मुळे आम्हाला आज दिव्यांग बांधवांच्या या कार्यक्रमात सहभागी होऊन संवाद साधता आला असे गौरव उद्गार मनसे उप जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ गंगवाल यांनी काढले आपल्या अध्यक्षीय भाषणात दिव्यांगांना अनमोल असे मार्गदर्शन करून दिव्यांग रेल्वे पासचा कशा प्रकारे त्याचा वापर करावा रेल्वे प्रवास करताना काय काय काळजी घ्यावी तसेच दिव्यांग बांधव हे दिव्यांग नसून त्यांना मी माझे गुरु मानतो दिव्यांग बांधवांनी स्वतःला अजिबात कमी लेखू नये दिव्यांग बांधवांना कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत अशी ग्वाही कोपरगाव ग्रामीणचे अष्टपैलू पी आय श्री वासुदेवजी देसले साहेब यांनी दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसंगी बोलताना ७५ दिव्यांग बांधवांना रेल्वे पास वाटप करताना आज खूप आनंद होत आहे व त्याहीपेक्षा दिव्यांगांची सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल अधिक आनंद होत आहे तसेच उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे मनसे दिव्यांग सेनेच्या वतीने सत्कार करून त्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन दिव्यांग बांधवांच्या कार्यक्रमास हजर राहून मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल आभार मानण्यात आले तसेच हे दिव्यांग पास काढण्यासाठी माझे मित्र विजुभाऊ कासलीवाल अनंत दादा रूकारे नरेंद्रजी दगडे राजेंद्र सुपेकर यांनी वेळोवेळी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने आभार व धन्यवाद असे दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल प्रास्ताविक प्रसंगी बोलत होते उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पारखे यांनी कार्यक्रमाची सांगता केली याप्रसंगी कोपरगाव तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच दिव्यांग बांधवांना मनसे दिव्यांग सेनेच्या वतीने रेल्वे पास उपलब्ध करून देण्यात आले त्याबद्दल सर्व दिव्यांग बांधवांनी मनसे दिव्यांग सेनेचे आभार मानले
