वारीत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा शालेय विध्यार्थ्यांना दिले योगा चे धडे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जून रोजी श्री रामेश्वर विद्यालय वारी येथे भारतीय योग संस्थान दिल्ली संचलित वारी केंद्रांचे योगा शिक्षक वाल्मिक कर्डीलेसर व इतर मार्गदर्शकांच्या उपस्थितीत योगाभ्यास करत साजरा करण्यात आला.


यावेळी योगासने प्राणायाम, ध्यान करत विध्यार्थी,शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांनी योगा दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला.
भारतीय योग संस्थान व रयत शिक्षण संस्थेचे श्री रामेश्वर विद्यालय वारी तसेच जि .प. प्रा. शाळा वारी यांचे संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन शाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते.
यावेळी श्री कैलास शेळके सर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले यावेळी योग साधकांचा शाल,श्रीफळ, गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला


माजी पंचायत समिती सदस्य योग साधक अशोक कानडे यांनी भारतीय योग संस्थानच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांपासून निशुल्क सेवा केंद्र वारीत सुरु असुन नियमितपणे सकाळी योगा होतो आहे त्याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवहान करुन योगासन, प्राणायाम, ध्यान या संदर्भात शास्त्रोक्त माहिती सांगितली,मुख्यध्यापक पाळंदे सर यांनी यावेळी योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तर राष्ट्रीय योग शिक्षक वाल्मिक कर्डीले सर यांनी उपस्थिताना योगाचे धडे देत योग साधनेचे महत्व पटवून दिले योग शिक्षक वाल्मिक कर्डीले , अशोक कानडे,बाळासाहेब मुरार, प्रफुल्ल गायकवाड, केतन संत यांनी यावेळी योगासनांची विविध प्रात्यक्षिके सादर केली सुक्ष्मव्यायाम,पद्मासन,भुजंगासन शलभासन त्रिकोणासन,वृक्षासन,
ताडासन,सूर्यनमस्कार ,शवासन,नावासन,अनुलोम विलोम प्राणायाम पूर्व तयारी यासह योगा संदर्भात शास्त्रोक्त माहिती देवून त्याचे निरोगी आणि उत्तम आरोग्यासाठी होणारे फायदे सांगितले.

याप्रसंगी भारतीय योग संस्थेचे सर्व योगा साधक,शाळेचे मुख्यध्यापक छबुराव पाळंदेसर,चव्हाणसर ,कैलास शेळकेसर, तुपेसर, जोर्वेकर सर, सुकटे सर, जाधवसर,चव्हाण सर, प्रशांत टेके, बाबासाहेब गोरे, मच्छिंद्र गांगड ,सतिश मैराळ,सतिश गायकवाड, खवले सोनवणे मामा आदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय योग दिनी योग शिक्षकांकडून मिळालेल्या शास्त्रोक्त माहिती आणि प्रात्यक्षिकाने विद्यार्थी ,शिक्षक व वारी ग्रामस्थ आदी उपस्थितांनी समाधान व्यक्त केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *