रोहमारे कुटूंबाचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान:- आमदार सुधीर तांबे….

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
कोपरगांव तालुक्यातील जवळके येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयास नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे साहेब यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली असता यावेळी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डी.आर सोनवणे यांनी डॉ. तांबे यांचा सत्कार केला.
यावेळी डॉ. तांबे यांनी बोलतांना सांगितले की, कोपरगाव तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात रोहमारे परिवाराचा मोलाचा वाटा असून त्यांनी तालुक्यातील गोर-गरीबांच्या विद्यार्थी – विद्यार्थिनींचे उच्च शिक्षण मिळावे या उद्देशाने कोपरगाव, जवळके तसेच चासनळी येथे सुरू केलेल्या महाविद्यालयाद्वारे तालुक्यातील अनेक विद्यार्थी घडले असून ते आज देशासह जगभरातील विविध नामांकित कंपन्या मध्ये उच्च पदावर कार्यरत असून रोहमारे परिवाराने सुरू केलेल्या या शिक्षण संस्थेमुळे नक्कीच तालुक्याच्या विकासाला चालना मिळत असल्याचे गौरोउद्गार आमदार तांबे यांनी या भेटी प्रसंगी व्यक्त केले. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षिका यांचे शैक्षणिक कार्य बघून डॉ. तांबे यांनी समाधान व्यक्त करत सर्वाना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *