कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील संजीवनी शिंगणापुर परिसरातील प. पू. धोंडीबाबा चव्हाण संचलित साईधाम मंदिराचा वर्धापनदिन सोहळा गुरूवारी मोठया उत्साहात पार पडला., भोपाळच्या साईचरित्रकथाकार सुमित पोंडा यांनी साईकथेचे निरूपण सादर केले. दिल्लीच्या नागर आणि पार्टी भक्त मंडळाने सदाबहार साईभजनावली सादर केली.
प्रारंभी श्री. सुरेश चव्हाण, एकनाथ चव्हाण यांनी साईभक्तांचे स्वागत केले. विजयराव नायडु व त्यांच्या सहका-यांनी दिवसभरातील धार्मिक कार्यक्रमात मोलाचा सहभाग दिला. गेल्या दोन वर्षापासुन कोरोना महामारीमुळे वर्धापनदिन कार्यक्रम साजरा करण्यावर मर्यादा आल्या होत्या. मात्र यावर्षी मेरठ, उत्तरप्रदेश, गुजराथ, दिल्ली, मुंबई, पंजाब, पुणे, नाशिक, भोपाळ, बिहार आणि मध्यप्रदेशातील साईभक्तांनी मोठया प्रमाणात हजेरी लावत या उत्सव सोहळयात भाग घेतला.
भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाल्या की, प. पू. धोडींबाबा चव्हाण यांनी साईभक्तीच्या जोरावर देश विदेशातील भक्त येथील साईधामशी जोडले. त्यांच्या हयातीत त्यांनी अनेकांचे दुःख, संकट हरण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. साईबाबा शिर्डी आंतरराष्ट्रीय देवस्थानमुळे कोपरगांवच्या साईधामचाही लौकीक वाढला आहे.
या वर्धापनदिन सोहळयासाठी संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटचे कार्यकारी विश्वस्थ अमितदादा कोल्हे, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, थोरात दुध उद्योग समुहाचे आबासाहेब थोरात, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, जंगली महाराज देवस्थानचे वसंतराव आव्हाड, पुणे प्रति शिर्डीचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवळे, यांच्यासह सर्व साई सेवेकरी मोठया प्रमाणांत उपस्थित होते. मसालेभात व बुंदीचा महाप्रसाद यावेळी वाटण्यांत आला. साईधाम व धोंडीबाबा मंदिरावर विद्युत रोषणाई व फुलांची आकर्षक सजावट करण्यांत आली होती.
चौकट-भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी साईभक्तांना महाप्रसादासाठी स्वतः पु-या लाटुन त्याचे वितरण केले.

फोटोओळी:-कोपरगांव
प. पू. घोडीबाबा चव्हाण संचलित साईधाम मंदिराचा वर्धापनदिन सोहळा गुरूवारी पार पडला. भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी साईंची पाद्यपुजा केली.
