उक्कडगांव सोसायटीच्या निवडणुकीत काळे गटाचा धुव्वा…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनीधी:-
तालुक्यातील पुर्व भागातील प्रतिष्ठेच्या असलेल्या उक्कडगांव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकींत जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने तेराच्या तेरा जागा पटकावत प्रतिस्पर्धी आमदार आशुतोष काळे गटाच्या उमेदवारांचा धुव्वा उडविला आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून आर एस जोशी यांनी काम पाहिले.
सर्व विजयी उमेदवारांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.
विजयी उमेदवारात सर्वश्री नवनाथ एकनाथ निकम, पंढरीनाथ बारकु निकम, नानासाहेब माघव निकम, पंढरीनाथ कोंडीराम निकम, ज्ञानेश्वर सोपान निकम, संपत कारभारी सिनगर, बाबासाहेब गोविंद निकम, विठठल भगवंता निकम, रमेश भिका बागुल, अलका अशोक निकम, रूक्मीणीबाई अंबादास निकम, बाळासाहेब शंकर शिंदे, प्रभु रंगनाथ नन्नवरे यांचा समावेश आहे. पुर्व भागातील उक्कडगांवसह सर्व गांवे हा माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा बालेकिल्ला असुन उक्कडगांव सोसायटीच्या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी या निवडणुकीत प्राधान्याने लक्ष देवुन विजयश्री खेचुन आणण्याकामी गांव पातळीवर संघटन मजबुत केले. या सोसायटीचे सर्व सभासद शेतक-यांनी हा विजय माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांना समर्पित केला असुन त्यांच्या स्वप्नांच्या परिपुर्तीसाठी एकदिलाने काम करून जिल्हा बँकेच्या सर्व योजनांची युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली अंमलबजावणी करून शेतक-यांची प्रगती साधु असे उक्कडगांव देवीचे येथील सर्व जेष्ठ कार्यकर्ते व संजीवनी युवा मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी निर्धार केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *