जुन्या प्र.४ ला समस्यानगरीच म्हणावे लागेल? :- ना. आशुतोष काळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील बहुतांश प्रभागात विकासाच्या काही ना काही समस्या वर्षानुवर्षापासून प्रलंबित आहेत हे जनता दरबाराच्या मध्यमातून समोर आले आहे. मात्र जुना प्रभाग क्रमांक ४ व सध्याचा ५ या प्रभागाच्या नागरिकांनी मांडलेल्या समस्या पाहता या प्रभागात मागील काही वर्षात विकास झालाच नाही असे दिसून येत असून प्रभागाला समस्यानगरीच म्हणावे लागेल असे उपहासात्मकपणे ना. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
कोपरगाव शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडविण्यासाठी कोपरगाव शहरात ‘नामदार आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी गुरुवार (दि.१६) रोजी प्रभाग क्र. ५ (जुना प्रभाग क्र. ४) मधील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी त्यांच्यासमोर अक्षरश: समस्यांचा पाऊस पाडला. त्यावेळी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांनी या प्रभागाला समस्यानगरीच म्हणावे लागेल असे म्हटले आहे.


पुढे बोलतांना ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून कोपरगाव शहराची विकासाच्या बाबतीत झालेली दुरावस्था जवळून पाहिली आहे. प्रत्येक घरासमोर पाणी साठविण्यासाठी ठेवलेल्या प्लास्टिकच्या टाक्या आणि छोटे-मोठे भांडे पाहतांना वाईट मनाला वाटत होते. मात्र कोणत्याही प्रकारची सत्ता नसल्यामुळे विरोधकांनी केलेली शहराची परवड पाहण्याखेरीज पर्याय नव्हता. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मला दिलेल्या संधीतून ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधी महाविकास आघाडी सरकारकडून आणू शकलो त्यातून हा गंभीर असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मात्र प्रत्येक प्रभागात जावून नागरिकांच्या समस्या जाणून घेतांना असे निदर्शनास येत आहे की, आजवर अनेक प्रभागातील नागरिक मुलभूत विकासापासून आजही वंचित आहेत. प्रभाग क्र. ५ (जुना प्रभाग क्र. ४) मधील नागरिकांच्या समस्या पाहून तर हा प्रभाग विकासाच्या बाबतीत किती मागे आहे याची प्रचीती येते. हि परिस्थिती बदलविण्यासाठी व प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आता नागरिकांनी बदल करून मी दिलेल्या उमेदवारांना निवडून द्यावे तुमच्या प्रभागाच्या विकासाच्या समस्या निश्चितपणे मार्गी लागतील असा विश्वास उपस्थित प्रभागातील नागरिकांना ना. आशुतोष काळे यानी दिला. तसेच या प्रभागातील ज्या समस्या तातडीने सोडविणे अत्यंत गरजेचे आहे त्या समस्यांची आवश्यक त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून त्या समस्या सोडवण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना यावेळी त्यांनी दिल्या.
यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, आरोग्य अधिकारी डॉ. गायत्री कांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा सचिव सौ. रेखा जगताप, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, हाजी मेहमूद सय्यद, रमेश गवळी, कृष्णा आढाव, फकीर कुरेशी, दिनकर खरे, सौ. मायादेवी खरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, बाळासाहेब रुईकर, राजेंद्र खैनरार, इम्तियाज अत्तार, मुकुंद इंगळे, राजेंद्र आभाळे, राजेंद्र जोशी आदी मान्यवरांसह प्रभागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *