राज्यसभा निवडणूक विजयाबद्दल कोपरगावात आनंदोत्सव…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तीनही उमेदवारांनी प्रचंड मतांनी विजय मिळविला.अतिशय अटीतटीच्या व चुरशीच्या या निवडणुकीला फारच महत्व प्राप्त झाले होते.
सत्तारूढ महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशा संघर्षात माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी चाणाक्षपणे डावपेच आखून सत्तारूढ आघाडीतील तीनही पक्षांच्या रणनीतीचा पराभव केला. संख्याबळ कमी असतांनाही अपक्ष आमदारांशी चर्चा करून त्यांना आपलेसे केले व मोठा विजय प्राप्त केला. गुप्त मतदान नसतानाही मिळविलेला हा विजय कौतुकास्पदच म्हणावा लागेल. यानंतर 20 तारखेला होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने सत्तारूढ महाविकास आघाडीचे धाबे आजच दणाणले दिसते.
भारतीय जनता पार्टी,वसंत स्मृती कार्यालायचेवतीने आज कोपरगाव शहरात फटाके फोडून, गुलाल उधळून,पेढे वाटून विजयोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी माजी नगराध्यक्ष श्री.विजय वहाडणे, अध्यक्ष विनायक गायकवाड, सतिशसेठ कृष्णानी, प्रभाकरजी वाणी, माजी नगरसेवक संजय कांबळे,रवींद्र बागरेचा, पी.एम.पाटील, विजय जोशी, भागवत सर, सुरेश कांगोणे, गणेश वाणी, संजय वायखिंडे, सतीश वायखिंडे, हिवाळे, ठोंबरे इ.निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *