
कोपरगाव प्रतिनीधी
(श्रीरामपूर):- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाची आढावा बैठक आज (दि. १२) जून रोजी सकाळी १०.०० वाजता श्रीरामपूर संगमनेर रोड वरील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पार पडली.
प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या आढावा बैठकीचे प्रसंगी या आढावा बैठकीचे निरीक्षक म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष नवाजभाई शेख यांनी काम पाहिले.
प्रहार जनशक्ति पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यमंत्री मा.ना. श्री. बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्हाध्यक्ष मा. श्री अभिजीतदादा पोटे यांचे आदेशाने सदर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नूतन पदाधिकारी यांचा परिचय करून घेणे. मतदारसंघातील सर्व पदाधिकारी यांचा कामाचा आढावा घेणे. संघटनेत कामकाज करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा विनिमय करणे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणूक बाबत चर्चा करून निर्णय घेणे. नवीन सदस्य नोंदणी व गावनिहाय शाखा उघडणे बाबत विचारविनिमय करणे आदींसह ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करून निर्णय घेणे आदी विषयांवर चर्चा झाली.

या बैठकीचे प्रास्ताविक श्रीरामपूर विधानसभा उपाध्यक्ष लक्ष्मण खडके यांनी केले. तर नवाजभाई शेख यांनी पदाधिकाऱ्यांचा परिचय करून दिला.
प्रसंगी श्रीरामपूर तालुका संघटक रमेश भालके श्रीरामपूर विधानसभा श्रीरामपूर युवा तालुकाध्यक्ष दीपक पटारे, श्रीरामपूर तालुका युवक कार्याध्यक्ष नानासाहेब तागड, श्रीरामपूर तालुका संघटक रमेश भालके, श्रीरामपुर-नेवासा संघटक डॉ. किसन शिंगोटे, राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष शरद वाळुंज, देवळाली प्रवराचे शहर अध्यक्ष विजय कुमावत, देवळाली प्रवरा शाखा अध्यक्ष अमोल अंबिलवादे, आधार दिव्यांग संघटनेचे राम डमाळे, देवळाली प्रवरा महिला शहर अध्यक्ष भाग्यश्री कदम, प्रसादनगर शाखा अध्यक्ष अमोल साळवे, राहुरी फॅक्टरी महिला शहर अध्यक्ष रजनीताई कांबळे आदींनी या आढावा बैठकीच्या चर्चेत सहभाग घेतला.
या बैठकीचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे भोकर, भालगाव, गोंडेगाव, घोगरगाव, मातुलठान या गावांमध्ये प्रहार ची कार्यकारिणी देऊन शाखा उघडणेसाठी मागणी घेऊन मोठ्या संख्येने आलेले नागरिक. त्यांचा लवकरच शाखा उदघाटणाचा कार्यक्रम ठेवणेचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
त्याचबरोबर या आढावा बैठकीला हजर नसलेल्या सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणेचा निर्णयही यावेळी घेणेत आला आहे.
तसेच श्रीरामपूर तहसील कार्यालयासमोर बसणाऱ्या स्टॅम्प वेंडर, सेतू कार्यालयातील कर्मचारी यांचेकडून नागरिकांना होणारी अरेरावी आणि शासकीय दरापेक्षा जास्त दर आकारून होणारी लूट थांबविणेसाठी करावी लागणारी कार्यवाही यावर चर्चा झाली, तसेच जेथे गरज आहे तिथे शिधापत्रिका साठी नागरिकांना मदत करणेसाठी उपाययोजना करणेचे सर्वानुमते ठरले.
अश्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात दुपारी ०१.०० वाजता आप्पासाहेब ढुस यांचे अध्यक्षीय भाषण व आभार प्रदर्शनाने आढावा बैठकीची सांगता झाली.
बैठकीस श्रीरामपूर विधानसभा उपाध्यक्ष लक्ष्मण खडके यांचेसह श्रीरामपूर युवा तालुकाध्यक्ष दीपक पटारे, श्रीरामपूर तालुका युवक कार्याध्यक्ष नानासाहेब तागड, श्रीरामपूर तालुका संघटक रमेश भालके, श्रीरामपुर-नेवासा संघटक डॉ. किसन शिंगोटे, राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष शरद वाळुंज, राहुरी फॅक्टरी शहर उपाध्यक्ष एकनाथ वाणी, राहुरी फॅक्टरी फॅक्टरी उपशहर प्रमुख गणेश भालके, शाखाध्यक्ष भास्कर वाकडे, देवळाली प्रवराचे शहर अध्यक्ष विजय कुमावत, उपाध्यक्ष शिवाजी मुसमाडे, जगन्नाथ शिरसाठ, सुखदेव शिरसाठ, दत्तात्रय शिरसाठ, नवनाथ शिरसाठ ज्ञानदेव शिरसाठ, बाबासाहेब तुपे, देवळाली प्रवरा शाखा अध्यक्ष अमोल अंबिलवादे, आधार दिव्यांग संघटनेचे राम डमाळे, सुमित राहिले, भिकाजी जाधव, दत्तात्रय म्हैस, देवळाली प्रवरा महिला शहर अध्यक्ष भाग्यश्री कदम, संघटक सुनील कदम, हरिभाऊ कदम, भारत चौधरी, प्रसादनगर शाखा अधक्ष अमोल साळवे, राहुरी फॅक्टरी महिला शहर अध्यक्ष रजनीताई कांबळे, उपाध्यक्ष अफसाना सय्यद, उपाध्यक्ष वंदना कांबळे, आसिफ पठाण आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
