संत ज्ञानेश्वरच्या विद्यार्थ्यांनी लुटला सोनी मराठीचा “कोण होणार करोडपती” कार्यक्रमाचा आनंद…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगावात प्रथमच सोनी मराठी वरील कोण होणार करोडपती या सुप्रसिद्ध शो मध्ये थेट प्रेक्षक म्हणून सहभाग घेता येणार यासाठी सोनी मराठी चॅनलच्या टीमने कोपरगावातील एस.जी.विद्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम पहाण्यासाठी संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलचे शिक्षक,विद्यार्थी व नागरिक यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला. सोनी मराठी कडून आयोजित या कार्यक्रमात कोपरगावतील दहा जणांना मुंबई येथे होणाऱ्या “कोण होणार करोडपती” या कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून सुप्रसिद्ध मराठी हिरो सचिन खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम बघण्यासाठी निवड करण्यात आली आहे. या दहा विजेत्यांमध्ये संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या सहशिक्षिका प्रियांका सोनवणे,ठोळे उद्योग समुहाचे कैलासचंद ठोळे,सपना जाधव,हास्य क्लबचे चंदुलाल बजाज, डॉ.सोनिया रणदिवे,कला शिक्षक अतुल कोताडे, प्रसिद्ध निवेदक सुधीर (राजेंद्र) कोयटे,दिलीप तुपसैंदर, नितीन जाधव, आकाशवाणी कोपरगावचे विजय कासलीवाल यांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत शो मध्ये जाण्यासाठी “गोल्डन पास” जिंकल्याने उपस्थित नागरिक आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले व आनंद व्यक्त केला. असे ज्ञान व मनोरंजक कार्यक्रम कोपरगावात वारंवार घेण्यात यावे. ज्यातून कोपरगावकरांना व विद्यार्थ्यांचे सर्वसामान्य ज्ञानात भरपडून प्रोत्साहन मिळेल. असे आवाहन जिल्हा नियोजन समिती सदस्य विशाल झावरे यांनी सोनी मराठीच्या टीम ला केले. विजेत्यांना सोनी मराठी तर्फे भेटवस्तू देण्यात आली.या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर स्कूलच्या विद्यार्थ्यांशी सोनी टीव्हीच्या निवेदकाने संवाद साधत गुणवंत विद्यार्थ्यांना भेट वस्तू दिल्या. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन कोपरगावात प्रथमच केल्याबद्दल सोनी मराठीच्या टीमने स्वच्छतादूत सुशांत घोडके, निवेदक श्रीकांत बागुल यांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनी मराठीचे आर.जे. श्रीकांत यांनी केले. उपस्थितांचे स्वागत व सन्मान मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर सर यांनी केले.या वेळी एस.जी.विद्यालयाचे सहसचिव सचिन अजमेरे,मा. नगरसेवक विवेक सोनवणे, क्रीडा शिक्षक निलेश बडजते सर,रमेश गायकवाड सर, मोनाली निंबाळकर मॅडम, पल्लवी तुपसौंदर मॅडम, उमाताई रायते मॅडम,संत ज्ञानेश्वरचे मुख्याध्यापक सचिन मोरे, सहशिक्षिका वसुधा झावरे,प्रियांका शेलार,सोनाली हुळेकर,स्वाती गहिरे,सहशिक्षक अनुप गिरमे यांचे सह एस.जी.विद्यालय आणि संत ज्ञानेश्वर स्कूलचे शिक्षक, नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *