के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची कराटे स्पर्धेत गरूडझेप…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अहिल्यानगर जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा कार्यालय अहिल्यानगर, श्री दि.ग.सराफ विद्यालय व डॉ.दे.अ. ओहरा कनिष्ठ महाविद्यालय संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.11/10/2025 रोजी शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा 2025-26 चे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलींच्या गटात के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची 11वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु. सप्तमी डहारे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे, तर 12 वी कला शाखेची विद्यार्थिनी कु.स्तुती त्रिभुवने हीने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. प्रथम क्रमांक मिळविलेल्या सप्तमीची निवड पुणे येथे होणाऱ्या शालेय विभागस्तरीय कराटे स्पर्धेसाठी झाली आहे. त्याबद्दल दोन्ही खेळाडू विद्यार्थिनींचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील विभागीय स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *