
सूर्यतेजचे दीपावली-पाडवा घर तेथे रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण…
आयुर्वेदाचार्य डॉ.रामदास आव्हाड यांची उपस्थिती…
कोपरगाव प्रतिनिधी:-
दूरचित्रवाणीतील मालिका,मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जमान्यात भावी पिढीवर अनिष्ट परिणाम होत असून वेगवेगळे संस्कार पुढे येत आहे.यात मुली व्यस्त होत आहे.त्यामुळे सकाळी लवकर उठून अंगण स्वच्छ करून शेणाचा सडा टाकून रांगोळी टाकायची ही परंपरा दिवसेंदिवस कमी होत आहे.रांगोळी सारख्या संस्कार कलेचे संक्रमण पुढील पिढी कडे नेण्याचे काम माता-भगिनींनी करुन या कलेचे महत्व टिकवावे.असे आवाहन जिल्हा न्यायाधिश सयाजीराव को-हाळे यांनी केले आहे.
सूर्यतेज संस्था कोपरगाव वतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहमदनगर जिल्हा शाखा,बाल रंगभूमी परिषद,कापसे पैठणी येवला,धन्वंतरी आयुर्वेदिक पंचकर्म कोपरगाव,यशश्री बॅंगल्स ॲन्ड काॅस्मेटिक्स् कोपरगाव,अग्रवाल चहा कोपरगाव,बोरा कलेक्शन कोपरगाव,फोटोग्राफर असोसिएशन कोपरगाव,कलाध्यापक संघ,कोपरगाव यांचे विशेष सहकार्यातून दीपावली-पाडवा ‘घर तेथे रांगोळी स्पर्धा – २०२१’ या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.
पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायाधिश सयाजीराव को॒-हाळे, राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डाॅ.रामदास आव्हाड, अग्रवाल चहाचे संचालक नारायण अग्रवाल,सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके, सल्लागार सदस्या प्रा.लताताई भामरे,ॲड.स्मिताताई जोशी, डॉ.निलिमा आव्हाड, उपप्राचार्या मंगलाताई राजेभोसले, राष्ट्रीय रांगोळी कलाकार प्रा.मसुदा दारुवाला आदि मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी न्यायाधिश श्री.को॒-हाळे पुढे म्हणाले,आपण रांगोळीला विसरत चाललो आहोत का? रामायण, महाभारत या ग्रंथात या कलेचा उल्लेख आढळतो.रांगोळी स्वागताचे प्रतिक आहे.ग्रामीण भागात रांगोळीचे दगड आणून ते खलबत्त्यात कुटून रांगोळी केले जात हे संस्काराचे संक्रमण पुढच्या पिढीत करु शकलो नाही.त्या क्रीया कुठेतरी थांबल्या आहेत.रांगोळी पहात गल्ली गल्लीतून हा प्रवास आनंददायी वाटायचा.सूर्यतेज संस्था ही कलेच्या संस्काराचे संक्रमण करत आहे.ही कौतुकास्पद बाब आहे.आपल्या पुर्वजांनी एकत्र कुटुंबाबरोबर परंपरेचे केलेले संस्कार महत्वाचे आहे.घरा पुढे सडा टाकणे आणि रांगोळी काढणे हा एक संस्कार आहे.तो पुढे चालू ठेवावा.असे सांगत सूर्यतेजच्या सदस्यांचे आणि सर्व पारितोषिक विजेत्यांचे अभिनंदन करुन रांगोळी हा उपक्रम सुरु ठेवावा. शेजा-यांसह सगळ्यांना प्रेरित करावे.असे शेवटी सांगितले.
या प्रसंगी राष्ट्रीय आयुर्वेद गुरु,आयुर्वेदाचार्य डॉ.रामदास आव्हाड म्हणाले, कोपरगाव तालुक्यात सूर्यतेजचे माध्यमातून २१ वर्षांपासून निरंतर सुरू असलेले सामाजिक, सार्वजनिक उपक्रम हे सेवाभावी आहे.हे सर्व समुहाचे सेवाभावी कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
भारतमाता प्रतिमा पुजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.सुरुवातीला शेतकरी कै.कमलबाई देशमुख,स्व.वसंतराव वहाडणे, छायाचित्रकार स्व. चंद्रकांत चोपडे,स्व.बंडोबा चिंचपुरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.स्वागत गीत गायन स्वागत गीत वैभवी गोरे, निकिता गायकवाड (शारदा संगीत) यांनी गायले.
रांगोळी स्पर्धेतील पारंपरिक,निसर्गचित्र,व्यक्ती चित्र, सामाजिक विषय, व्यंगचित्र या पाच प्रकारातील प्रथम विजेत्यांना पैठणी, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तर गुणवत्ता यादीतील स्पर्धकांना सन्मानचिन्ह, भेटवस्तू, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा.अनिल अमृतकर, प्रा.प्राजक्ता राजेभोसले,सौ.वासंती गोंजारे,महेश थोरात,अनंत गोडसे,प्रा.अतुल कोताडे,प्रा.मतीन दारुवाला,रश्मी जोशी, गौरी दिवटे,पत्रकार वनीता भसाळे, रुतुजा कोळपकर,सुशील टोरपे,दर्शना हलवाई,वंदना अलई यांनी परिश्रम घेतले आहे.
