संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या समर कॅम्पची सांगता अंकाई किल्ल्यावर…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
दरवर्षी प्रमाणे संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व तसेच कृतीयुक्त अभ्यासातून आणि विविध खेळांतून विद्यार्थ्यांचा विकास व्हावा या हेतूने समर कॅम्पचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी गेल्या आठ दिवसांपासून संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये सुरू असलेल्या समर कॅम्प मध्ये हॉर्स रायडिंग, हॉलीबॉल,खो-खो,कबड्डी,क्रिकेट,थ्रो बॉल,टेबल टेनिस,चेस,कॅरम,चित्रकला तसेच संस्कृत श्लोक,ट्रेकिंग,डिजिटल क्लास च्या माध्यमातून गड किल्ल्यांची माहिती असे विविध प्रकारचे विकासात्मक गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्यासाठी शाळेच्या वतीने समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे शाळातील विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य हा समर कॅम्प आयोजित केल्याने पालकांनी संस्थेचे कार्यकारी संचालक विशाल झावरे यांचे आभार मानले. काल समर कॅम्पच्या शेवटच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी अगस्ती ऋषींची तपोभूमी किल्ले अंकाई सर करत निसर्गाच्या कुशीत भोजनाचा अस्वाद घेतला व तलावातील गार पाणी,लेण्या आणि किल्ल्यावरच्या माकडांचा भरपूर आनंद लुटला. किल्ल्याच्या तटबंदीतून विद्यार्थी चालत असतांना त्यांना शिवकालीन वातावरणाचा अनुभव घेता आला व अगस्ती ऋषी आणि प्रभू श्रीरामांची भेट ज्या अगस्ती गुहेत झाली तिथे जाऊन दर्शन घेण्याचा योग विद्यार्थ्यांना लाभला. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना किल्ल्याची संपूर्ण माहिती दिली. तसेच समर कॅम्प मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना अंकाई किल्ल्यावरच संस्थेच्या कार्यकारी संचालक व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विशाल झावरे यांच्या हस्ते प्रशिस्ती पत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. कौतुकाची बाब म्हणजे इयत्ता पहिली व दुसरीचे चिमुकले विद्यार्थी देखील या अंकाई किल्ल्याच्या मोहिमेत सहभागी झाले होते. या वेळी शाळेच्या शिक्षिका वसुधा झावरे, वैशाली लोखंडे,प्रियांका शेलार,प्रियांका फाटककर,सोनाली हुळेकर,वैशाली भगत,उमा गिरमे,स्मिता भागडे,प्रतिभा नवले,शिक्षक अनुप गिरमे,सागर खटावकर,विजय शिंदे,अक्षय नन्नावरे,चंद्रहंस पाबळे, सतीश लोळगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *