संजीवनी सिनिअर काॅलेजला मायक्रोबायोलाॅजी पीएच. डी. सेंटरची मान्यता:- श्री अमित कोल्हे…

Uncategorized
                                   अहमनगर व नाशिक  जिल्ह्यातील  पहिले पीएच.डी. सेंटर...

कोपरगाव प्रतिनिधी:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी आर्टस्, काॅमर्स आणि सायन्स काॅलेजला मायक्रोबायोलाॅजी विषयातील पीएच.डी. सेंटरची (सुक्ष्मजीवशास्त्र संशोधन केंद्र) मान्यता मिळाली असुन अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत हे सुक्ष्मजीवशास्त्र विषयासाठी पहिले केंद्र असुन विद्यापीठाच्या गेल्या साठ वर्षाच्या इंतिहासात संजीवनीला हा बहुमान मिळाला आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
संजीवनी मधिल सुसज्ज प्रयोगशाळा, आधुनिक यंत्रसामुग्री, येथिल प्राद्यापकांचे नॅशनल व इंटरनॅशनल जर्नलस् मध्ये प्रसिध्द झालेले शोध निबंध तसेच त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जावुन कान्फरंसेसमध्ये भाग घेवुन मिळविलेले ज्ञान, इत्यादी बाबी परीपुर्ण असल्यामुळे येथे सुक्ष्मजीवशास्त्र विषयाच्या संशोधन केंद्रास मान्यता मिळाली आहे. आता या केद्रामार्फत मायक्रोबायोलाॅजी विषयात पीएच.डी. करू इच्छिनाऱ्या व्यक्तींना फायदा होणार आहे. या केंद्राचे कार्य २०२०-२३ या शैक्षणिक वर्षांपासून कार्यन्वीत होणार आहे. पीएच. डी. करू इच्छिनाऱ्या विद्यार्थ्यांना डाॅ. समाधान दहिकर व डाॅ. सरीता भुतडा हे मार्गदर्शक म्हणुन काम करणार आहे, असे श्री कोल्हे शेवटी म्हणाले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी पीएच. डी. सेंटरच्या उपलब्धी बाबत समाधान व्यक्त करून संबंधित स्टाफचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *