रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल च्या अध्यक्षपदी राकेश काले आणि सचिव पदी विशाल आढाव यांची निवड…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल चे २०२३-२४ च्या अध्यक्षपदी राकेश काले आणि सेक्रेटरीपदी विशाल आढाव यांची निवड सहाय्यक प्रांतपाल श्री दीपक मनियार यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात जाहीर करण्यात आली आहे.
सदरील कार्यक्रमात रोटरी क्लबच्या नूतन कार्यकारणीत खजिनदार अमर नरोडे, क्लब ट्रेनर डॉ. विनोद मालकर, पब्लिक इमेज डायरेक्टर प्रकाश जाधव, टी आर एफ डायरेक्टर कुणाल आभाळे, मेंबरशिप डायरेक्टर सनी आव्हाड यांचा समावेश आहे.
नूतन कार्यकारणी सदस्यांना मावळते अध्यक्ष वीरेश अग्रवाल यांनी शुभेच्छा देत कार्यकारणी जाहीर केली.
नूतन अध्यक्ष राकेश काले यांनी सांगितले की, रोटरी प्रांत ३१३२ हा महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांचा व ९१ क्लबचा मिळून बनलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव रोटरी चा समावेश होतो. रोटेरियन स्वाती हेरकळ या रोटरी प्रांत ३१३२ च्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून एक जुलै २०२३ पासून जबाबदारी स्वीकारत आहे. मागील २३ वर्षांपासून त्या रोटरी मध्ये सक्रिय आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्पांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. अनेक ग्लोबल ग्रँड त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली यावर्षी परिवर्तन, शिक्षण, आरोग्य, निसर्ग, महिला आणि युवा वर्गांसाठी विविध प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
रोटरीचे सदस्य , मार्गदर्शक आणि संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमितदादा कोल्हे आणि विश्वस्त श्री सुमितदादा कोल्हे यांच्यासह विविध मान्यवरांनी नूतन अध्यक्ष, सेक्रेटरी आणि कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रसंगी मागील प्रेसिडेंट रोहित वाघ, डॉ. रावसाहेब शेंडगे, रिंकेश नरोडे, हर्षल दोषी , विक्रम लोढा, विशाल मुंदडा, अनुप डागा, अनुप पटेल, नवनाथ सोमासे, डॉ. महेंद्र गवळी, सुमित पवार आणि इतर रोटरी सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोफेसर इमरान सय्यद तर आभार प्रदर्शन मा.श्री. सुमितदादा कोल्हे यांनी केले.

फोटो: राकेश काले व विशाल आढाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *