
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- रमजान महिना हा पावित्र्य, प्रार्थना, दानधर्म व परोपकाराचा अनोखा संगम आहे. या पूर्ण महिन्यात मुस्लीम बांधव रोजे (उपवास) धरून अल्लाची विशेष नमाज (तराबी) मध्ये कुराण पठण करतात. त्यानंतर येणारा रमजान सण हा मुस्लीम बांधवांसाठी आनंदाची पर्वणी आहे. ‘रमजान ईद’ च्या दिवशी मुस्लीम बांधवांनी शुद्ध आचरण, शुद्ध आचार व विचारातून मनोभावे केलेले सामुदायिक नमाज पठण अल्लापर्यंत पोहोचते. अल्लाने सर्व मुस्लीम बांधवांच्या प्रार्थनेचा स्वीकार करावा व सर्व मुस्लीम बांधवांच्या जीवनात आनंद, सुख-शांती व सर्वांना चांगले आरोग्य लाभावे अशा शुभेच्छा श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे सर्व मुस्लीम बांधवांना ‘रमजान ईद’ सणानिमित्त दिल्या.
कोपरगाव शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये मुस्लीम बांधव रमजान ईदचा सण साजरा करीत असतात. मात्र मागील दोन वर्षापासून संपूर्ण विश्वावर आलेल्या कोरोना संकटामुळे ’रमजान ईद’ सण हा घरात बसूनच साजरा करावा लागला होता. मात्र यावर्षी सर्व निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे सर्व मुस्लीम बांधवांनी मोठ्या उत्साहात ‘रमजान ईद’ चा सण साजरा करून ईदगाह मैदानावर व अक्सा मस्जिद येथे सामुदायिक नमाज पठण केले. याप्रसंगी ना. आशुतोष काळे यांनी उपस्थित राहून सर्व मुस्लीम बांधवाना ‘रमजान ईद’ च्या शुभेच्छा दिल्या. यावर्षी ‘रमजान ईद’ व ‘अक्षय तृतीया’ हे दोनही सण एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे यावेळी अनेक मुस्लीम बांधवांनी ना. आशुतोष काळे यांना आलिंगन देवून त्यांना देखील ‘अक्षय तृतीयेच्या’ शुभेच्छा दिल्या.
यावेळी पोलीस उपअधीक्षक संजय सातव, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, मौलाना हामिदभाई, मौलाना आसिफभाई, माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद, अजीज शेख, फकीर कुरेशी, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, जावेद शेख, इम्तियाज अत्तार, रहेमान कुरेशी, फिरोज पठाण, शकील खाटीक, पप्पु सय्यद, आसिफ शेख, शफीक शेख, नदीम मन्सूरी, मुन्ना सय्यद, साजिद शेख, हारुण शेख, शकील खाटीक, शफीक सय्यद, आयुब शेख, शरीफ पठाण, चांदभाई पठाण, राजु शेख, युसुफ शेख, मुनिर शेख, मुन्ना मन्सूरी, डॉ. झिया शेख, इस्माईल शेख, रशीद शेख, युसूफ शेख, मोसीन सय्यद, अस्लम पठाण, रियाज सर, अबू बकर मनियार, मुन्ना शेख, जावेद शेख, शाहरुखकुरेशी, इरफानतांबोळी, अकबर शेख, जुनेद शेख, मतीन चोपदार, इरफान तांबोळी, हाजी अल्ताफ कुरेशी, हाजी मन्सूर शेख, इम्रान पठाण, निसार शेख, मेहमूद खान बागवान, सलीम पठाण, भुरा पठाण, हाजी अकिल अत्तार, अकिरा बागवान, हाफिज रियाज, मुन्ना पठाण, अॅड. दारुवाला, जावेद एकता, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्षज संदीप वर्पे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, शहराध्यक्ष सुनील गंगूले, कार्याध्यक्ष संतोष चवंडके, माजी नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, राजेंद्र वाकचौरे, रमेश गवळी, दिनकर खरे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष निखिल डांगे, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार, रावसाहेब साठे, प्रकाश दुशिंग, अशोक आव्हाटे, बाळासाहेब रुईकर, वाल्मिक लहिरे, आकाश डागा, अॅड.मनोज कडू, नारायण लांडगे, पप्पु शहा, मुकुंद इंगळे, एकनाथ गंगूले, राजेंद्र आभाळे, विलास आव्हाड, राकेश शहा, तुषार साठे, दिनेश संत, तेजस साबळे आदींसह मुस्लिम बांधव उपस्थित होते.
