जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून मागील पाच वर्षात ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास:- ना. आशुतोष काळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- पाच वर्षापूर्वी कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेने इतिहास घडवत मोठ्या विश्वासाने जिल्हा परिषद, पंचायत समितीची सत्ता दिली. त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी घेवून सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आदी विभागात अनमोल योगदान दिले. त्यामुळे मागील पाच वर्षात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास झाला असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे मावळत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा निरोप समारंभ व सत्कार सोहळा कोपरगाव येथे ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेने टाकलेल्या विश्वासाची परतफेड सर्व सदस्यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात विकास कामे करून केली. मिळालेल्या सत्तेचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ हा समाजातील तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत नेवून त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविला असल्याचे गौरवदगार ना. अशुतोष काळे यांनी यावेळी काढले
याप्रसंगी कारभारी आगवन, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, सुधाकर दंडवते, सौ. विमलताई आगवन, सौ. सोनाली रोहमारे, सौ. सोनाली साबळे, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. अनुसयाताई होन, सौ. पौर्णिमा जगधने, माजी उपसभापती अर्जुनराव काळे, अनिल कदम, माजी सदस्य श्रावण आसने, मधुकर टेके, बाळासाहेब रहाणे, दिलीप दाणे, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, रोहिदास होन, प्रसाद साबळे, राहुल जगधने, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, अभियंता उत्तम पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, डॉ. काटे मॅडम, गटशिक्षण अधिकारी शबाना शेख, कृषी अधिकारी पंडित वाघिरे आदींसह पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *