
भारत स्काऊट राज्य पुरस्कार नुकताच मुंबईत स्वीकारला…
कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील वारी येथील रहिवाशी असणारा सोमैय्या विद्यामंदिर साकरवाडी या शाळेचा विद्यार्थी असणारा स्काऊट नचिकेत भाटी याने अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व केले होते त्याचा नुकताच मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम भगतसिंग कोश्यारीजी यांचे शुभहस्ते भारत स्काऊट राज्य पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन त्याला गौरविण्यात आले होते

या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे नुकताच वारी ग्रामपंचायतीच्या वतीने नचिकेत भाटी व त्याचे वडील अनिल भाटी यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिशभाऊ कानडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी झालेल्या कार्यक्रमात पंचायत समितीचे सदस्य मधुकरराव टेके , माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे, लोकमत चे उपसंपादक रोहीत टेके, रामेश्वर विद्यालय वारीचे मुख्याध्यापक छबुराव पाळंदेसर,ग्रामविकास अधिकारी दिलीप वारकर,प्रा आ केंद्र वारीचे डॉ वरद गर्जे यांनी मनोगत व्यक्त करून नचिकेत यांस शुभेच्छा दिल्या

यावेळी स्काऊट नचिकेत भाटी याने अविस्मरणीय असे अनुभव आल्याचे सांगितले व ग्रामस्थांनी दखल घेऊन सत्कार केल्या बद्दल ग्रामस्थांचे तसेच सरपंच सतिशभाऊ कानडे यांचे विशेष आभार मानून राष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले
यावेळी नानासाहेब टेके,भास्कर आदमने, गोकुळ कानडे, अशोक बोर्डे,शेळके सर, तुपेसार,रावसाहेब वाघ, सतिश गायकवाड यांचे सह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते
