म्हस्की येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा मोठ्या उत्साहात…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- सालाबादप्रमाणे याही वर्षी वैजापुर तालुक्यातिल म्हस्की येथे योगिराज सदगुरुजी गंगागिरी महाराज ब्रम्हालिन सदगुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने तसेच ग्रामस्थांच्या प्रयत्नाने व पंचक्रोशीतील भाविक भजनी मंडळाच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा करण्यात आले आहे.या कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.यावेळी ज्ञानेश्वरीचे वाचन पारायणही करण्यात आले आहे.

श्रीमद भागवत कथा ह.भ.प.अनंत महाराज वहाडणे यांच्या रसाळ अमृतवाणीतुन कथा कार्यक्रम झाला आहे.ह्या भागवत कथेसाठी साथसंगत गायनाचार्य व तबलावादक ह.भ.प. सचिनभैय्या जाधव, ऑर्गन वादक व बुलबुल वादक ह.भ.प. विठ्ठल मामा मोरे, हार्मोनियम वादक व गायनाचार्य ह.भ.प. नंदकिशोर देवकर यांनी साथसंगत केली,

या कार्यक्रम आयोजन समितीचे अध्यक्ष कोडिंराम सोमवंशी,बाबासाहेब सोमवंशी,अमोल सावंत,मोहन सोमवंशी,गोकुळ सोमवंशी ,भगवान सोमवंशी योगेश सोमवंशी बाबासाहेब सोमवंशी नानासाहेब तागड अनिल सोमवंशी,सुरज सावंत, शरद सोमवंशी,दत्तु सोमवंशी,बाळु सावंत,अमोल खिल्लारी,रामेश्वर सोमवंशी,कृष्णा सोमवंशी,कांताराम सोमवंशी,सुशांत सोमवंशी,ज्ञानेश्वर सोमवंशी,नानासाहेब सावंत, रामेश्वर सावंत अशीष सोमवंशी,परशराम खिल्लारी,गोकुळ हरदे,रामनाथ सोमवंशी,कडु सावंत सुदाम सोमवंशी,सुभाष सावंत. आदिंनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आहे.याप्रसंगी संरपंच नंदु हरदे,ग्रामपंचायत सदस्य नानाभाऊ तागड,ट्रस्टचे सदस्य अंखड हरिनाम सप्ताह कमिटीचे अध्यक्ष कोडिंराम सोमवंशी,प्रहारचे वैजापुर तालुका अध्यक्ष गणेश सावंत, मंदिर ट्रस्टचे सदस्य हरि चंद्रभान सोमवंशी यांनी भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *