
कोपरगाव प्रतिनिधी:-
महिलांची महाराष्ट्रीयन वेशभूषा नथी शिवाय पुर्ण होतचं नाही ,स्त्रीच्या
सौदर्यामधे नथी मुळे भर पड़ते.
सध्या महाराष्ट्रामधे विविध प्रकारच्या नथी चे डीजाइन ट्रेंड सुरु असुन कोपरगांव शहर येथे देखिल नुकतीच महाराष्ट्रियन नथ बनवन्याची कार्यशाला पार पडली ,या कार्यशाळेला महिलांसह युवतीचा देखिल उस्पुर्त प्रतिसाद लाभला .अगदी पुर्वपरंजात नववारी साड़ी आणि त्यावर सोंन्याची नथ हे कॉम्बिनेशन दिसून येत होते, पण आता अनेक प्रकारच्या नथी च्या डिज़ाइन दिसून येतात ,बाजीराव मस्तानी या चित्रपट नंतर नथीच्या डिज़ाइन ला महिला वर्गात जोरदार मागणी आहे, सुंदर चेहर्यावर भरगच नथ त्यावर मोती आणी खड्याचे कोंदन ,पुणेरी नथ, पेशवाई नथ,बानू नथ ,हिर्याची नथ, पाचूची नथ ,नावाची नथ ,सायली सूर्या, ई विविध प्रकारच्या नथी बनवन्याच प्रशिक्षण तसेच मार्केटिंगची माहिती यावेळी नीलम क्रिएशन मार्फत देण्यात आली, नवरीच्या पेहरावात देखिल नथ महत्वाची ठरते ,सुंदर नथीने चेहरा अत्यंत भरगच्च अधिक लक्षवेधी व आकर्षक दिसतो लग्न तसेच सण समारंभामधे लेटेस्ट नथीचा ट्रेंड सुरु असुन महिलाकडून वेगवेगळ्या नथीची मागणी वाढत असल्याचे प्रशिक्षिका सौ. नीलम कानडे यांनी यावेळी सांगितले . पारंपरिक दागिन्यानंमधे महाराष्ट्रीयन नथीला विशेष महत्व आहे ,नव्या नवरीला त्या मराठमोळ शोभिवंत लुक देतात सध्या हा एक ट्रेंड म्हणून प्रसिद्ध असुन तो महाराष्ट्रपुरता मर्यादित राहिलेला नाही, महाराष्ट्रीयन नथीना मुखड़ा असेही म्हणतात ,सम्पूर्ण महाराष्ट्राची परंपरा या नथीच्या रंगात,साहित्यात आणि गुणवत्तेत दिसून येते, नथ हा अलंकार स्रियांचा आवडता दागिना आहे, हिन्दू संस्कृतीत नथ फक्त नखरा नसून वैद्यानिक दृष्टिनेही तीचे महत्व आहे. फ़ैशन ट्रेंड कड़े लक्ष्य दिल तर जुन्याच फैशन चे नूतनी करण होवून तेच ट्रेंड पुन्हा येत असतात. प्रत्येक वेशभुषेवर त्याच वेशभुषेप्रमाणे स्वताला ढलनारा दागिना म्हणजे नथ,पूर्वीच्या काळी नथ मानाचे व सौंदर्याच लक्षण समजले जायचे .मॉडर्न फैशन नुसार नथीचा नखरा म्हणून सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या या नथीच्या वापरामागे काही शास्रीय कारने देखील आहेत.
आज महाराष्ट्रभर चंद्रकोर प्रमाणे दिसणारी मोत्यांची नथ नाकाच्या डाव्या नासिकेत घालतात, आयुर्वेदाप्रमाणे स्रियांच्या डाव्या नासिकेतुन जाणाऱ्या काही रक्त वाहिन्या गर्भाशयाशी जोडलेल्या असतात व त्यामुळे त्या बिंदूवर टोचवुन घेतल्यामुले स्रियाना प्रसूतिवेदना कमी होते व प्रजननाशी संबंधित सगळे अवयव सदृढ़ राहतात असे म्हटले आहे, सुश्रुत संहिता अध्याय १९ चिकित्सा स्थान नुसार नाक टोचवूंन घेतल्याने बाळंतपन सोपे होण्या व्यतीरिक्ति स्रियांचे व ऋतू प्राप्ति झालेल्या मूलीचे नाक टोच ल्याने त्यांना मासिक पाळीच्या वेळी अतिरक्तस्राव होने ,पोटदुखी, कंम्बरदुखी,अनीमिया होने इत्यादी कमी होते तसेच हातपाय वाकडे होने,शरीरातील अतिरिक्त उष्णता शोषली जाते ,त्यामुळे उष्णते मुळे होणारे आजार पित्त खवळने ,अंगावर फोड़ फुटकूळ्या येणे ,हतापायाला भेगा पड़ने,नाक फुटुन रक्तस्राव होने हे त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतात तसेच सोन्या किवा चांदीची नथ घातल्याने त्यांच्यात जटपट होणारे मुड़ स्विगज कमी होवू शकतात ,नकारात्मक विचार कमी होवून कंसेंट्रशन वाढते ,अस म्हणतात की नथ ही मुळची भारतीय नाही कारण आपली वैज्ञानिक पुस्तके ,पुराण ई नथी बदल काहीच सांगत नाहीत ,ती नथीविषयी मौन आहेत, त्यामुळे नथ ही नक्की आपल्याकडची आहे का हे ठोस सांगणे जरा कठीणच यउलट मुग़ल ईतिहासात नथी ची नोंद मात्र मिळते काही इतिहास करांच अस मत आहे की नथ ही मध्य पूर्वेतुन जेव्हा मुग़ल भारतात आले त्यांच्याबरोबर भारतात आली आणी भारतीय अलंकारापैकी एक बनली ,नवुवारी,सहावरी ,जीन्स, सलवार कमीज किंवा वन पीस अगदी कशावरहि नथ घातली जाते, ढोल ताशा पथकामधे तर डोक्यावर फेटा ,नाकात नथ आनी हातात ढोल हे समिकरण बघनाऱ्यांचे डोळ्यांचे पारने फेडते .आता श्रावण महीना सुरू असुन त्यासोबत असंख्य अशा मराठी सणांची रेलचेल सुरु आहे ,सण म्हटले की काठ पदरच्या साड्या आणी त्यावर सुंदर अशी नथ आलीच भारतीय संस्कृतीत सोला श्रृंगाराणा अतिशय महत्व दील आहे, नथ हा नासिका भूषणातिल एक महत्वाचा प्रकार असुन हिन्दू स्रियांत ती सौभाग्यलंकार म्हणूनच रूढ़ होवून बसली आहे , तथापि नथ शब्द ऐवजी दहाव्या शतकानतरच्या संस्कृति साहित्येत मसगमोवतिक, नासामुक्ताफल असे उल्लेख आढळतात ,त्यामुळे नवव्या दहाव्या शतकानंतरच भारतात नथ हा अलंकार मुसलमानाच्या संपर्काने आला असन्याची शक्यता काही विद्वनांनी दर्शविलेली आहे ,परकीय आक्रमनासोबत भारतात दाखल झाला आनी संस्कृती देवाण घेवाण च्या माध्यमातुन आपल्या संस्कृतीच अविभाज्य भाग बनला व पेशवाई च्या कालखंडात नथीला वैभव प्राप्त झाले कारण सत्ता स्तीरस्तवर होवून आर्थिक संपन्नता प्राप्त झाली होती त्यामुळे विविध मोती, खड़े यांचा वापर केला जावू लागला ,इतर दागिन्यांच्या मानाने याचा आकार व प्रकार मर्यादित आहेत,त्यापैकी नथ,चमकी, बुलाल, बेसर, लवंग, लटकन घुंगी, बाला, फुली, कतिया, मोरपंखी,संपानगी, मौनरिया व पोगुल इ प्रकार प्रदेश परेत्व विशेष प्रचलित आहेत .सामान्यतहा सोने, चांदी, तांबे, पितळ इ धातु त्याचप्रमाणे जड़व कामासाठी हिरे, माणिक, मोती इ मौल्यवान रत्न यांचा वापर करण्यात येतो ,चमकी हा नासिकाभूषनामधे आकाराने सर्वात लहान असा प्रकार असुन तो सोन्यावर रवे पाडून तयार करण्यात येतो .महाराष्ट्रियन स्रियां डाव्या नाकपुड़ीत तर दक्षिणत्य स्रियां सामान्यत उजव्या नाकपुड़ीत घालण्याची रूढी आढळते ,नथीला मुखरा असेही म्हणतात .घुंग्री हे चमकीप्रमाने पण संकीर्ण आकृतिबंधाचे नासिकभूषन असुन त्याचा वापर विशेषतः नेपाळी व सिक्किम स्रियां करतात ,महाराष्ट्रात सोन्याचा फ़ासा असलेल्या तारेत सात किवा अधिक मोती मधोमद लाल रत्न बसवलेली असे नथीचे स्वरूप असते, पोगुल हे नासिकभूषन जवळजवळ नथी सारखेच असुन कोरोमंडलच्या किनारेवरिल पुरुषही त्याचा वापर करतात, बाला हा नासिकभूषणा चा आकार चंद्रकोर सदृश असुन त्याला मोत्यांचे झुपके लावलेले असतात त्याचा वापर लाहोर भागातील स्रियांत आढळतो ,नथ व तिच्याभोवती पूर्णाकार बुलाल हे कुलू प्रदेशातील स्रियांच एक वैशिष्ट्य पूर्ण नासिकाभूषण आहे, मौनरिया हे राजस्थानी नासिकाभुषण म्हणजे मोठ्या आकाराचे गोल कड़ेच त्याचा आकार व सजावट पुष्पगुच्छ सदृश असते ,कश्मीर मधील नासिकभूषणत मात्र नक्षीकाम व कलाकुसर बरीच केलेली असुन त्याला गोंडे लावलेले असतात
