कोपरगावात पोलिसांच्यावतीने दंगा काबू पथकाची रंगीत तालीम…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
30/04/2022 रोजी ४ वाजुन ५० मिनिटे ते ६ वाजुन १० मिनिटाच्या दरम्यान कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील बाजार तळ,कोपरगाव येथे रमजान ईद व अक्षय्य तृतीया सण उत्सवाच्या अनुषंगाने दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली.

सदर दंगा काबू रंगीत तालीम योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.त्यांनतर ६ वाजुन १५ मिनिटे ते ६ वाजुन ४५ मिनिटांच्या दरम्यान कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथुन चर्च समोरुन-गांधी चौक-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा -विघ्नेश्वर चौक -डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा-धारणगाव रोडने-छत्रपती संभाजी महाराज चौक-राममंदिर रोडने-आचारी हॉस्पीटल-गांधीनगर रोडने-भगवा चौक- टिकळनगर येथुन तहसिल मैदान,कोपरगाव येथे पर्यंत रुट मार्च काढण्यात आला व त्यानंतर तहसिल मैदान येथे ६ वाजुन ४५ मिनिटे ते ७ वाजुन १५ मिनिटे पर्यंत मॉक ड्रिल घेण्यात आली आहे.सदर दंगा काबु योजना रंगीत तालीम,रुट मार्च व मॉक ड्रिल करीता कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे 02 पोलीस अधिकारी, 15 पोलीस अंमलदार, राहता पोलीस स्टेशनचे 01 पोलीस अधिकारी,05 पोलीस अमंलदार शिर्डी पोलीस स्टेनचे 01 अधिकारी, 03 पोलीस अंमलदार व लोणी पोलीस स्टेशनचे 01 पोलीस अधिकारी व 04 पोलीस अंमलदार हजर होते.कोपरगाव नगरपालिका फायर फायटर व अँबुलन्स हजर ठेवण्यात आले होते. तसेच आगामी काळात साजरे होणाऱ्या सण उत्सव अनुषंगाने सतर्क राहणे बाबत तसेच दंगा काबु रंगीत तालीम व मोब ड्रिल दरम्यान सर्व अधिकारी व अंमलदार यांना योग्य ते मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *