
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर या ठिकाणी दि.१६ एप्रिल.२०२२ रोजी श्री.विजयी हनुमान उत्सव समिती लक्ष्मीनगर यांच्या वतिने दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी भद्रा मारुती या ठिकाणाहून पायी ज्योत आणली असुन सकाळी हनुमान मंदिरात धार्मिक पूजाविधी करुन पुजापाठ करण्यात आला.गेल्या ३५ वर्षापासून या ठिकाणी हनुमान जयंती साजरी करण्यात येत असुन याही वर्षी मोठ्या भक्ती भावाने हनुमान जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाप्रसाद कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

त्याच बरोबर ह.भ.प.बाळकृष्ण महाराज सुरासे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम घेतला या किर्तनाच्या कार्यक्रमात परमपूज्य मठाधिपती रमेशगिरीजी महाराज तसेच कुंभारी आश्रमाचे महंत श्री श्री १०८ राघवेश्वरानंदगिरीजी महाराज (उंडे महाराज) , औद्योगिक वसाहत चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांची उपस्थिती लाभली, यावेळी आशुतोष भाऊसाहेब भाबड,यांची MPSC मार्फत जलसंपदा विभागात निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार कमिटीच्या वतीने करण्यात आला.






किर्तनासाठी साथ संगत करणारे ह.भ.प. भिमराज महाराज जाधव (किर्तनाचार्य व गायनाचार्य) ह.भ.प.सोपानकाका बारहाते (गायनाचार्य), ह.भ.प.सचिनभैय्या जाधव (गायनाचार्य), ह.भ.प. नंदकिशोर देवकर (गायनाचार्य), ह.भ.प. धिरज कुर्हे (मृदुंगाचार्य), ह.भ.प. भाऊसाहेब जाधव (हार्मोनियम), ह.भ.प.वामनराव कदम, ह.भ.प.साहेबराव आहेर, ह.भ.प.आसाराम कदम, ह.भ.प.विनायक राजगुरु, ह.भ.प.श्रीराम कदम, ह.भ.प.रमेश गायकवाड, ह.भ.प.सुदाम भुजाडे, ह.भ.प.दिनकर वाणी, ह.भ.प.चैतन्य जाधव, ह.भ.प. गिरीश हिवाळे, ह.भ.प.बढे महाराज, ह.भ.प.कृष्णा रोठे, ह.भ.प.डाके गुरुजी, ह.भ.प.नाईक तात्या, ह.भ.प.कैलास पाचरणे, ह.भ.प.कैलास राजगुरु भजनी मंडळ उपस्थित होते.


