
कोपरगाव प्रतिनिधी:-
मित्र फाउंडेशनच्या वतिने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतात.२६/११ च्या दहशतवादी हल्यात दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता.यात अनेकांना प्राण गमवावा लागला.या हल्याला पोलिसांनी चोख उत्तर देवुन देशाचे रक्षण केले.परंतु या हल्यात अनेक पोलिस अधिकारी शहीद झाले.या शहिदांच्या स्मरणार्थ मित्र फाउंडेशनच्या वतिने रक्तदान शिबिर घेवुन शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे.मित्र फाउंडेशन व एच डी एफ सी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई वरील 26/11/2008 रोजी दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रध्दांजली म्हणून 45 वे रक्तदान शिबीर आयोजित केले आहे,दिनांक ;- 27/11/2022 वार ;- रविवार सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत हे शिबिर होणार असुन मराठा पंच कार्यालय आनंद भवन शेजारी बजारतळ,कोपरगाव या ठिकाणी या शिबिराचे आयोजन केलेले आहे.अशी माहीती मित्र फाउडेशन वैभव आढाव यांनी दिली आहे.
