कोपरगांव शहर व तालुका आरपीआय आठवले गटाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमीत्त भव्य मोटारसायकल रॅली, मिरवणूक व रक्तदान शिबीराचे आयोजन…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमीत्त कोपरगांव शहर व तालुका आरपीआय आठवले गटाच्यावतीने १४ एप्रिल रोजी भव्य मोटारसायकल रॅली व भिमसरकार संजयनगर आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या शुभहस्ते होत असल्याची माहिती तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशुर यांनी दिली.
ते म्हणाले की, १४ एप्रिल रोजी मोटारसायकल रॅली लुंबीनी बुध्दविहार कोपरगांव येथुन पुज्य भंते आनंद सुमनसिरी, पुज्य भंते कश्यप यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ७ वाजता शुभारंभ होत आहे, तर सायंकाळी ७ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. तर १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता विवेकानंदनगर कोपरगांव येथील लायन्स पार्क यमुनाबाई सभागृहात भव्य रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांस अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग उर्फ बाळासाहेब संधान, उत्तर महाराष्ट्र राज्याचे सचिव दिपक गायकवाड, भारतीय बौद्ध महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र मेहेरखांब, संपर्कप्रमुख शांताराम रणशुर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व रिपाई कार्यकर्त्यांनी या मोटारसायकल रॅली व मिरवणुकीत, रक्तदान शिबीरात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रिपाई आठवले गटाचे शहराध्यक्ष देवराम पगारे, तालुका कार्याध्यक्ष प्रदिप आहिरे, भिमसाम्राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रदिप गायकवाड, महिला तालुकाध्यक्षा अलका देवगांवकर, युवक शहराध्यक्ष पप्पू दिवेकर, तालुका उपाध्यक्ष सतिष रणधिर, तालुका संघटक सतिष भाटे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर धेनक व आठवले गट रिपाईच्या सर्व पदाधिका-यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *