
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 197/2022 भा.द.वि.क. 302,397,394,460,414,34 प्रमाणे दिनांक 03/06/2022 रोजी दाखल करण्यात आलेला आहे.
श्री जालींदर दत्तात्रय भुजाडे वय 40 वर्षे, धंदा नोकरी, रा. आपेगाव ता. कोपरगाव हल्ली पुणे, यांनी फिर्याद दिली की, दिनांक 30/05/2022 रोजी रात्री 8:30 वा. नंतर ते दिनांक 01/06/2022 रोजी दुपारी 2:00 वा. दरम्यान आपेगाव ता. कोपरगाव येथे माझे घराचे भिंतीवरुन कोणीतरी अज्ञात गुन्हेगारांनी घराचे छतावर प्रवेश केला व छतावर रात्रीचे वेळी झोपलेले त्यांचे वडील दत्तात्रय गंगाधर भुजाडे वय 75 वर्षे, व आई राधाबाई दत्तात्रय भुजाडे वय 65 वर्षे, रा. आपेगाव ता. कोपरगांव अशा दोघांची कोणत्या तरी हत्याराने हत्या करुन घरातील रोकड रक्कम चोरी करण्याचे उददेशाने कपाटांची उचकापाचक करुन 1,90,000/- रू किंमतीचे सोन्याचे दागिने व कागदपत्रे जबरीने चोरुन नेले व पुन्हा भिंतीवरुन उड्या टाकून निघून गेले आहेत. याबाबत वरील प्रमाणे गुन्हा रजिष्टर दाखल करण्यात आलेला आहे.
कोपरगाव तालुका पोलीसांनी गुन्हयाचे तपासाची चक्रे फिरवुन वरिष्ठांचे सुचना व मार्गदर्शनानुसार, गुन्हयाचा तपास करुन आरोपींचा शोध लावुन गुन्हयामध्ये आरोपी नामे (1) जनतेश उर्फ जंत्या छंदु काळे वय २१ वर्षे (२). अजय छंदु काळे वय २० वर्षे, दोघे चारी नंबर ४५, पढेगाव ता. कोपरगाव. (३) अमित कागद चव्हाण वय २० वर्षे रा. हिंगणी ता. कोपरगांव (४) रेघाबाई रतन भोसले वय ५५ वर्षे रा. ४५ चारी, पढेगाव ता. कोपरगाव यांना अटक करण्यात आलेली आहे. गुन्हयात आरोपी नामे कुंदन रतन भोसले रा. ४५ चारी पढेगाव ता. कोपरगाव हा अदयाप पावेतो फरार आहे.
सदर गुन्हयात चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आरोपी जनतेश छंदु काळे यांने काढुन दिलेने ते हस्तगत करुन गुन्हयात जप्त करण्यात आलेले होते. तसेच दागिन्यांची विल्हेवाट लावण्यास त्याला मदत करणारी आरोपी रेघाबाई रतन भोसले हीने सहाय्य केलयाने तिला तपासात अटक करण्यात आलेली आहे.
सदर गुन्हयात चोरीस गेलेले व आरोपीने काढुन दिलेले सोन्याचे दागिने किंमत 1,90,000 रुपयांचे त्यात सोन्याचे मनी मंगळसूत्र, सोन्याचे डोरले, सोन्याची अंगठी, सोन्याच्या बांगडया असा जप्त मुददेमाल मा. न्यायालयाचे आदेशान्वये श्री. दौलतराव जाधव, पोलीस निरीक्षक, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांनी गुन्हयातील फिर्यादी जालींदर दत्तात्रय भुजाडे यांना परत दिलेले आहे.
