

कोपरगाव प्रतिनिधी
(मुंबई,नाशिक):- राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्याकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षपदी प्रेरणाताई बलकवडे यांची फेरनिवड करण्यात आली. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मुंबई येथील कार्यालयात त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार शिवराम झोले, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, महाराष्ट्र प्रदेश सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे,जिल्हा कार्याध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे, गोरख बोडके,निवृत्ती अरिंगळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
