
कोपरगाव प्रतिनिधी:-
सहकाररत्न माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले,त्याच्या निधनाने कोपरगाव तालुकाच नव्हे तर जिल्हा सह संपूर्ण महाराष्ट्र हळहळला व कोपरगाव तालुका शोकसागरात बुडाला त्यांच्या अंत्यसंस्कारा नंतर प्रत्येक गावात-शहरात सर्व राजकीय पक्षांनी एकत्रीत शोकसभा, धार्मिक विधी करून आपल्या प्रिय नेत्याला श्रद्धांजली वाहीली.
दि.२०मार्च रोजी माहेगाव देशमुख येथे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे यांच्या उपस्थितीत सर्व राजकिय पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी शोकसभा घेऊन स्व.शंकरराव कोल्हे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
याप्रसंगी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे यांनी आपल्या आठवणींना उजाळा देताना म्हटले की, संजिवनी उदोग समूहाचे संस्थापक शंकरराव कोल्हे यांनी तालुक्याला पोटच्या पोरांसारखे सांभाळले.
आमच्या कुटुंबावर त्यांचे विशेष प्रेम होते १९७८ साली वडील दत्तात्रय पानगव्हाणे व एल. डी. पानगव्हाने यांनी माहेगाव देशमुख गावात कोल्हे पार्टीची मुहुर्तेमेढ रोवली त्यानंतर १९८४ साली वडीलांच्या रूपाने माहेगाव देशमुखला संजीवनी कारखान्याचे पहीले संचालकपद मिळाले. संकट काळात शंकरराव कोल्हे नेहमी आमच्या सोबत होते ३१ वर्षी पुर्वी आलेल्या संकटाने सर्व कुटुंब देशोधडीला लागण्याच्या मार्गावर होते सगळ्यांनी साथ सोडली होती एवढेच काय तर सावलीही आमच्या बरोबर नव्हती त्या वेळेला आम्ही खचुन गेलो होतो अशा बिकट परीस्थितीत मायेचा हात दिला व आम्हाला संकटातुन बाहेर काढले १९९९-२००० साली प्रामाणिकपणा बघुन बंधुंना संजीवनी कारखान्याचे संचालकपद देऊन प्रतिष्ठा व मान मिळवुन दिला.
सरपंचपदाची निवडणुक जिंकल्यानंतर साहेबांनी मोठे मन करून घरी येऊन माझे अभिनंदन केले. शंकरराव कोल्हे यांच्यामुळे माझे शिक्षण पुर्ण झाले, अन्यथा मीही आज अशिक्षित राहीलो असतो. सदैव कोल्हे कुटुंबाच्या ऋणात राहु इच्छितो असे सांगताना ते भावना विवश झाले.
त्यानंतर पवित्र गोदावरी नदीत शंकरराव कोल्हे यांच्या अस्थी कलशाचे विसर्जन करण्यात आले, यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी सरपंच संभाजीराव काळे,सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक सोपानराव पानगव्हाणे, संजीवनी पतसंस्थेचे व्हा. चेअरमन एल डी पानगव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते सुंदरराव काळे.प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब दत्तात्रेय पानगव्हाणे माजी सरपंच बापूसाहेब जाधव, माजी पोलीस अधीक्षक के पी रोकडे,उपसरपंच विकास रणसिंग सोसायटीचे माजी चेअरमन रवींद्र काळे,सिताराम पानगव्हाणे प्रल्हाद काळे,जगन्नाथराव भगुरे, उल्हास काळे,उत्तमराव पानगव्हाणे,बाबासाहेब पानगव्हाणे,वसंत पानगव्हाणे, चांगदेव पानगव्हाणे,बाळासाहेब भगुरे,अशोक पानगव्हाणे,पी आर काळे,आकाश काळे,संतोष जाधव,खैरनार सर,रावसाहेब पानगव्हाणे,तुळशीराम पानगव्हाणे,काभू धिरडे, बाळासाहेब पानगव्हाणे,रमेश भगुरे,मयूर पानगव्हाणे, आप्पासाहेब पानगव्हाणे,दत्ता पानगव्हाणे,नंदु चव्हाण,भारत पानगव्हाणे,नवनाथ वाघ,शरद रोकडे,भिमराज रोकडे,सुधाकर काळे यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
