
कोपरगाव प्रतिनिधी:-
ज्या काळात शेतकरी कुटुंबात शिक्षणाचा गंध नव्हता त्या काळात थेट परदेशात शिक्षण घेऊन समाजाच्या उद्धारासाठी आयुष्यभर काम करणारा काळाच्या पुढे असणारा नेता हरपला असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केले
माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या निधनानंतर नुकतीच पोळ यांनी कोल्हे कुटुंबियांची सांत्वन पर भेट घेतली त्या वेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना पोळ पुढे म्हणाले की कोल्हे साहेब हे काळाच्या पुढे असलेले जन मान्य नेते होते ज्या काळात शेतकरी कुटुंबात शिक्षणाचा गंध नव्हता त्यावेळी त्यांनी परदेशात जाऊन शिक्षण घेतले मात्र आपल्या शिक्षणाचा उपयोग सर्व सामान्य जनतेस व्हावा म्हणून त्यानी परदेशात नोकरी करण्याऐवजी गाव पातळी वर येऊन सर्व सामान्य जनते करिता आपले संपूर्ण आयुष्य झोकून दिले त्याच प्रमाणे सहकाराच्या माध्यमातून शेती व शेती पूरक व्यवसाय उभे करून शेतकऱ्यांना प्रेरणा दिली त्याच प्रमाणे शिक्षण तंत्रज्ञान, पाणी,कृषी आदी विषय अभ्यासून राज्यालाच नव्हे तर देशाला प्रेरणा देण्याचे काम केले असून त्यांच्या निधनाने जन सामान्यांचा बुलंद आवाज थांबला असला तरी त्यांच्या जीवन कार्यातून नक्कीच भावी पिढीने प्रेरणा घ्यावी असे म्हटले आहे
या वेळी माजी आ स्नेहलता ताई कोल्हे नितीन दादा कोल्हे, बिपीन दादा कोल्हे विवेक भैय्या कोल्हे,अमित कोल्हे सुमित आदींची सांत्वन पर भेट घेऊन लोक स्वराज्य आंदोलन व पोळ कुटुंबियांकडून सांत्वन केले
