
कोपरगांव प्रतिनिधी:-
माजीमंत्री शंकरराव कोल्हे हे अहमदनगर जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शक होते त्यांच्या निधनाने साखर व शेती उद्योगाचे अभ्यासू नेतृत्व हरपले अशा शब्दात् माजी खासदार व राहुरीचे लोकनेते प्रसाद तनपुरे यांनी श्रद्धांजली वाहिली.
मंगळवारी प्रसाद तनपुरे व त्यांचे सहकाऱ्यानी कोल्हे कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेतली त्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शंकरराव कोल्हे सार्वजनिक व साखर उद्योगाच्या कामात मास्टर होते. १९८० मध्ये आपण सर्वप्रथम राहुरी विधानसभेची निवडणूक जिंकुन विधीमंडळात गेलो, तेव्हा शंकरराव कोल्हे यांनी आम्हां अहमदनगर जिल्हयातील आमदारांना सांभाळून घेतले. शेती आणि शेतकरी, सिंचनाचे पाणी, साखर कारखानदारी हे त्यांचे आवडीचे विषय होते असे ते म्हणाले.
