
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथील माजीमंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या येसगाव कोल्हे वस्तीवर जाऊन मराठा विकास फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने माजी माजीमंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांना भावपूर्ण श्रध्दांजली आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी मराठा विकास फाउंडेशन ट्रस्ट अध्यक्ष ज्ञानेश्वर (राहुल भाऊ) आढाव, उपाध्यक्ष संतोष पेकळे, सचिव संतोष कुटे, खजिनदार कमलेशजी जाधव, सदस्य सचिन शेळके, शशिकांत दवंगे, अनिल शिंदे, संदिप आहेर, राहुल गायकवाड, एकनाथ लामखडे, संदिप पाठक, शशिकांत गायकवाड, आनंद गोडसे, सोमनाथ ढवळे उपस्थित होते.

यावेळी बोलताना मराठा विकास फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर (राहुल भाऊ) आढाव असे म्हणाले की, लोकनेते शंकरराव कोल्हे म्हणजे राज्याचे शिस्तप्रिय नेतृत्व, जनसंघात असलेली शिस्त पाळून मिळून मिसळून मार्गदर्शक लोकसंग्रहाची अडचणीची कामे मार्गी लावणारे नेतृत्व हरपले अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
तसेच उपाध्यक्ष संतोष पेकळे यांनी सुध्दा आपले आदरांजली रुपी भावना व्यक्त केल्या ते म्हणाले की,,
शंकरराव कोल्हे यांनी जनसंघाच्या प्रत्येक कामांत सतत मदतीचा हात पुढे करत आदराची भावना जपली, अशा या महान नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली, तसेच सचिव संतोष कुटे यांनी आपल्या भावना व्यक्त करत म्हणाले
शंकरराव कोल्हे यांनी देश व राज्य पातळीवर आपल्या राजकीय कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटविला, धडाडीचे नेतृत्व असुनही ते मनाने हळवे होते. अशा शब्दांत सर्वांनी भावना व्यक्त केल्या…
