शैलेश सिनगर यांना पीएच. डी….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
तालुक्यातील नामांकित एस. एस. असोसिएटचे संचालक व भोजडे येथील रहिवाशी शैलेश रावसाहेब सिनगर यांना विश्व मानवाधिकार सुरक्षा आयोग यांच्यावतीने नुकतीच पीएच. डी पदवी प्रदान करण्यात आली आहे. सिनगर यांनी मानव विकास, आर्थिक दुर्बलता व मानव अधिकार यावर प्रबंध सादर केला होता. त्यावर त्यांना पीएच. डी पदवी देण्यात आली. त्यांना अहमदनगर येथील राज्यकर निरीक्षक ज्ञानेश्वर जगताप, सामाजिक कार्यकर्ते स्व. राहुल टेके पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. भोजडे येथील जेष्ठ कार्यकर्ते रावसाहेब सिनगर यांचे ते चिरंजीव आहेत. सिनगर यांच्या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

फोटो ओळ:- शैलेश सिनगर, कोपरगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *