शिस्तप्रिय, मार्गदर्शक नेतृत्व हरपले:- हरिभाऊ बागडे…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
लोकनेते शंकरराव कोल्हे म्हणजे राज्याचे शिस्तप्रिय नेतृत्व, जनसंघात असलेली शिस्त पाळून मिळून मिसळून मार्गदर्शक लोकसंग्रहाची अडचणीची कामे मार्गी लावणारे नेतृत्व हरपले अशा शब्दात विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे यांनी श्रद्धांजली वाहिली.
शनिवारी हरिभाऊ बागडे यांनी येसगांव कोल्हे वस्ती येथे भेट देत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांचे सांत्वन केले त्याप्रसंगी ते बोलत होते.
शंकरराव कोल्हे यांनी जनसंघाच्या प्रत्येक कामांत सतत मदतीचा हात पुढे करत आदराची भावना जपली. गोळवलकर गुरुजींच्या लग्नात त्यांची व माझी भेट झाली होती. मराठवाड्याच्या प्रश्नांवर आम्ही विधीमंडळांत एकत्रीत भुमिका घेऊन तत्कालीन शासनांवर दबाव निर्माण करायचो; मात्र सायंकाळचे जेवण आमदार निवासच्या भोजनकथात आम्ही नियमीतपणे घेत असु. सहकारमहर्षो शंकरराव कोल्हे यांच्या संजीवनी उद्योग समुहाला अनेकवेळा भेट देऊन त्यांच्याकडून साखर कारखानदारीचे मार्गदर्शन आपण घेतले आहे. विधानसभेचा सभापती म्हणून ज्या ज्या वेळी आपण काम केले त्या त्या वेळी शंकरराव कोल्हे यांनी सांमजस्याची भूमिका घेऊन प्रश्न मांडले, अहमदनगरचे माणिकराव पाटील यांच्या कार्य काळातील आठवणींना त्यांनी उजाळा देत, शंकरराव कोल्हे यांच्यासारखााा लोकनेता पुन्हा होणे नाही असे ते शेवटी म्हणाले. त्यांच्या तिसऱ्या पिढीने जनविकासाचा वारसा पुढे चालू ठेवला हीच त्यांच्या कर्म क्रांतीची आदरांजली आहे.

फोटो ओळी:- कोपरगाव
विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे यांनी कोल्हे वस्ती येथे सांत्वनपर भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *