के.जे.सोमैया महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख प्रा. विजय ठाणगे यांना पीएच-डी पदवी प्राप्त…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
स्थानिक के.जे.सोमैया कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , कोपरगांव येथील इंग्रजी विभागप्रमुख व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. विजय ठाणगे यांना नुकतीच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विद्यापीठ, नांदेड़ या विद्यापीठाची इंग्रजी विषयात विद्यावाचस्पति (डॉक्टरेट) पदवी प्राप्त झाली.
प्रा.विजय ठाणगे यांनी डॉ. दिलीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली "प्रेमचंद व अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीचा तुलनात्मक अभ्यास" या विषयावर आपला शोध-प्रबंध सादर केला होता. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव मा. संजिवदादा कुलकर्णी, विश्वस्त मा. संदिपराव रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *