
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव डाऊच येथे काही दिवसांपूर्वी ६ मे २०२२ रोजी अपघात झाला होता हा अपघात भिषण होता.यात जागेवर सहा जण मयत झाले होते तर सहा जण गंभीर जखमी झाले होते त्यानंतर हाॅस्पीटल येथे उपचार घेत असतांना १ जणाचा मृत्यू झाला होता.

या अपघात ग्रस्तांना कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी तातडीने अपघात स्थळी हजर होवुन अपघात ग्रस्तांना संत जनार्दन हाँस्पीटल येथे उपचारासाठी दाखल केले होते.


त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले त्यांच्या या कार्याची दखल घेवुन नवी मुंबई येथील अँटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मधुकर थोरात यांनी यांच्या वतिने पोलिस निरिक्षक वासुदेव देसले यांचा सत्कार केला . याप्रसंगी स्वप्निल सरवदे, नवी मुंबई लोकसेवा अर्बन निधी संचालक, सुनिल खरात सामाजिक कार्यकर्ते, विद्युलता मोकळ सामाजिक कार्यकर्त्या,शामराव मोकळ, थोरात साहेब,संजय कानडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.या अपघातात रिक्षा चालक यांनाही गंभीर दुखापत झाली होती.

अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने त्यास दहा हजार रूपयांची रोख मदत करण्यात आली आहे. अपघातात मयतांना याप्रसंगी भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली आहे.
