भाजपा युवा मोर्चा व राजमुद्रा प्रतिष्ठान साई इलेव्हनच्या क्रिकेट चषकाचे बक्षिस वितरण संपन्न..!!

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
भाजपा युवा मोर्चा, राजमुद्रा प्रतिष्ठान, साई इलेव्हनच्या सहकार्याने शहरातील फादरवाडी परिसरात संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे चषक भव्य प्लॅस्टीक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, त्याचे बक्षिस वितरण जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते झाले.
भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, अनुराग येवले, प्रसाद आढाव, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे यांच्यावतीने ५१ हजार रूपयांचे पहिले बक्षिस साईइलेव्हन शिर्डी संघाने, राजमुद्रा प्रतिष्ठानचे अविनाश पाठक यांच्यावतीने ३१ हजार रूपयांचे दुसरे बक्षिस कान्हेगांव वारी संघाने, बापु कुमावत जॅकिसिंग दिगवा यांच्यावतीने २१ हजार रूपयांचे तिसरे बक्षिस राजमुद्रा प्रतिष्ठानने, तर अल्ताफ पठाण, नगरसेवक शिवाजी खांडेकर यांच्यावतीने ११ हजार रूपयांचे चौथे बक्षिस छत्रपती इलेव्हन कोपरगांव संघाने पटकावले त्या सर्वांचे जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले. प्रत्येकाच्या जीवनातील ताणतणावाची तीव्रता कमी करण्यास खेळाची मोठी मदत होते, खेळात सांघीक सातत्य ठेवले तर त्यातुन जागतिक दर्जाचे क्रीडा रत्न निर्माण होतात. येथील प्रत्येक खेळाडुंनी क्रिकेट खेळात सातत्य ठेवत आपले गुरूजन, माता पिता व कोपरगाव तालुक्याचा नांवलौकीक राज्यात व देशात वाढविण्यासाठी सतत कार्यरत रहावे, कष्टातूनच मोठे यश मिळते असेही विवेक कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले.
प्रारंभी गटनेते रविंद्र पाठक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक यांनी प्रास्तविक केले. याप्रसंगी सर्वश्री. अशोक लकारे, तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, अनुराग येवले, प्रसाद आढाव, नगरसेवक शिवाजी खांडेकर, फिरोज पठाण, सागर आहेर, पंकज पोंगळ, लक्ष्मण मंजुळ, बापू कुमावत, रवि मोरे, संदिप शिरसाठ, मनिंदर भाटिया, जॅकीसिंग दिगवा, अल्ताफ पठाण, असिफ शेख, मनिंदरसिंग भाटिया, सिमरन सिंग, परमजित सिंग, नितीन सांगळे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, क्रिकेट रसिक, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. सदरच्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साई इलेव्हनचे सर्व सहकारी तसेच सर्वश्री. राजसिंग भाटिया, संतोष साबळे, दिपक गंगवाल, भरत आमले, मंजु शेख, सलिम तांबोळी, जितू लहिरे, नरेंद्र अहिरे, सागर लकारे, नवाज शेख, संकेत वाघमारे, सिध्दु भाटिया, विकीसिंग राठोड, सनिर सिंग, जितु भाई, संकेत केकाण, सुशांत कानडे, सिंग इलेव्हन, राजमुद्रा प्रतिष्ठान, अक्सा ग्रुप, मावळा ग्रुप व दत्तनगर मित्र मंडळाने विशेष परिश्रम घेतले.

फोटो ओळी:-
कोपरगाव,भाजपा युवा मोर्चा, राजमुद्रा प्रतिष्ठान, साई इलेव्हनच्या सहकार्याने फादरवाडी कोपरगांव येथे संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे चषक भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याचे बक्षिस वितरण जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *