प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे व अ.नगर जि. सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांना लोकमतच्यावतीने ‘वुमेन आयकॉन ऑफ अहमदनगर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
महिला सबलीकरण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांना व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांना लोकमत परिवाराच्या वतीने दिल्या जाणाऱ्या लोकमत ‘वुमेन आयकॉन ऑफ अहमदनगर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजजी पाटील, भाजप नेत्या चित्राताई वाघ, लोकमतचे सरव्यवस्थापक नरेंद्रजी अंकुश, आवृत्ती प्रमुख सुधीरजी लंके, समता पतसंस्थेचे संस्थापक काकासाहेब कोयटे, रेणुकामाता मल्टिस्टेटचे संस्थापक प्रशांतजी भालेराव, बंगडीवाला उद्योग समूहाच्या संचालिका श्रध्दाताई बिहाणी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकजी भांगरे, महेंद्रजी गंधे, आदींसह इतर पुरस्कार्थी महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *