डॉ.शेफाली भुजबळ यांच्या ‘निसर्गायण’ या चार दिवसीय चित्रप्रदर्शनाचा समारोप…

Uncategorized

डॉ.शेफाली भुजबळ यांच्या ‘निसर्गायण’ चित्रप्रदर्शनास कलारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रदर्शनास एक हजाराहून अधिक मान्यवरांच्या भेटी…

कोपरगाव प्रतिनिधी
(नाशिक):-
डॉ.शेफाली भुजबळ यांनी रेखाटलेल्या विविध निसर्ग चित्रांचे नाशिक येथील हॉटेल एक्सप्रेस इन ग्रँड्युर हॉल येथे चार दिवसीय ‘निसर्गायण’ हे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या चार दिवसांत प्रदर्शनास एक हजारहून अधिक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या. चित्रप्रदर्शनास नाशिकमधील कलारसिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल डॉ.शेफाली भुजबळ यांनी समारोपाप्रसंगी सर्वांचे आभार मानले आहेत.

डॉ.शेफाली भुजबळ यांचे नुकतेच मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीत ‘अनावरणम्’ या त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन झाले. त्या प्रदर्शनात अमूर्तचित्र या शैलीची चित्रे प्रदर्शित केली गेली होती. त्यानंतर दि.१२ ते १५ मार्च दरम्यान नाशिक मधल्या चित्रप्रदर्शनासाठी त्यांनी निसर्ग ही थीम घेऊन ‘निसर्गायण’ हे चित्रप्रदर्शन भरविले होते. या चित्रप्रदर्शनात डॉ.शेफाली भुजबळ यांनी आपल्या शैलीच्या माध्यमातून रेखाटलेल्या ५० हून अधिक चित्रांचा समावेश होता. यामध्ये मानवी मनातील निसर्ग या चित्रात रंगबध्द करण्यात आलेला आहे. निसर्गाची विविध रूपे त्यांनी आपल्या विविध चित्रात रंग बद्ध केलेली आहेत. ही चित्रे अतिशय मनोवेधक ठरली. यावेळी भेटी दिलेल्या मान्यवरांनी डॉ.शेफाली भुजबळ यांनी चित्रकलेच्या जपलेल्या या आवडी बद्दल त्यांचे भरभरून कौतुक केले.

‘निसर्गायण’ या चित्रप्रदर्शनास चार दिवसात नाशिककर कलारसिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या चार दिवसात सुमारे एक हजारहून अधिक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन पाहणी केली. या चित्रप्रदर्शनाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल डॉ. शेफाली भुजबळ यांनी सर्व कलारसिकांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *