नगरपालिकास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीवर प्रकाश सुखदेव दुशिंग यांची नियुक्ती…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
राज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असे आघाडीचे सरकार असून काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी यांच्या कार्यकर्त्यांच्या अशासकीय समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश दुशिंग यांची नगरपालिकास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीवर नियुक्ती झाली असुन त्या निमित्ताने त्यांना समाजातुन शुभेच्छा देवुन मंगलकामना व्यक्त करण्यात येत आहे.समाजातील प्रत्येक घटकाचे प्रश्न समजावून घेऊन शासन स्तरावर सोडविण्यासाठी हे सदस्य काम करत असतात. यामुळे समाजाला निश्चित फायदा होणार आहे.नगरपालिकास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीवर प्रकाश सुखदेव दुशिंग,दिनकर खरे, सौ. माधवीताई राजेंद्र वाकचौरे, लक्ष्मण माधव सताळे, संदीप सावळेराम पगारे, रशिद बुढण शेख , यांची श्री.साईबाबा संस्थानचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती झाली आहे.सर्व विविध शासकीय समित्यांच्या अशासकीय नवनिर्वाचित सदस्यांचे नामदार आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *