
कोपरगाव प्रतिनिधी:-
आपल्या कोपरगांव शहराचे अभिमान सकल दिगंबर जैन समाजचे भुषन अहमदनगर जिल्हा मनसेची बुलंद तोफ श्री संतोषभाऊ कांतीलालजी गंगवाल यांनी केलेल्या अनेक सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन प.पु.आचायॆ श्री देवनंदीजी महाराज यांच्या शुभआशीर्वाद घेऊन नमोकार तीर्थ क्षेत्र चांदवड येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात त्यांची राज्यपातळीवर भारतीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमेटी
श्री शिखरजी पहाडिया राष्ट्रीय अध्यक्ष
श्री अनिल जमगे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
श्री ललित जी पाटणी अध्यक्ष राजाबाजार दिगंबर जैन समाज तसेच विश्वस्त कचनेर संस्थान श्री संतोष पेंढारे महामंत्री
डॉक्टर श्री महावीरजी शास्त्री महामंत्री
नीलम जी अजमेरा महामंत्री विक्रीकर अधिकारी श्री समेरजी काला यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र अंचल संयुक्तमंत्री पदी शपथ विधी घेऊन व सन्मान पत्र प्रदान करून निवड करण्यात आली या प्रसंगी देशातील सकल दिगंबर जैन समाजाचे मान्यवर तसेच विजय कासलीवाल,मनसे दिव्यांग सेना अहमदनगर जिल्हा अध्यक्ष योगेश गंगवाल राजेंद्रजी घाडगे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारत वर्षिय दिगंबर तीर्थ रक्षा कमिटिंच्या 122 वर्षोंच्या इतिहासात कोपरगाव मध्ये हे पद पहिल्यांदाच आले आहे.
यावेळी उपस्थित सर्वांनी श्री संतोष भाऊ गंगवाल यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
